पहूर येथे जुगाऱ्यांकडून पोलिसाला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 10:25 PM2019-08-18T22:25:13+5:302019-08-18T22:25:18+5:30
पहूर, ता. जामनेर : पेठगावातील बडा मोहल्ला भागात स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने जुगार खेळताना छापा मारून माजी उपसरंपचासह चौघांना रंगेहाथ ...
पहूर, ता. जामनेर : पेठगावातील बडा मोहल्ला भागात स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने जुगार खेळताना छापा मारून माजी उपसरंपचासह चौघांना रंगेहाथ पकडल्याची घटना रविवारी घडली. या कारवाईला काही जणांनी विरोध करीत एलसीबीच्या एका पोलिसांला धकाबुक्की घडल्याचा प्रकार समोर आला आहे.
या कारवाई दरम्यान काही काळ या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकाराने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कारवाईबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठ गावातील बडा मोहल्ला येथे जुगार सुरू असल्याची माहिती एलसीबीला मिळाली त्यानुसार या ठिकाणी एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लाहरे, सहायक फौजदार, अशोक महाजन, वैशाली महाजन, विजय पाटील, सचिन महाजन, भगवान पाटील, प्रमोद लाडवंजारी, अशोक पाटील यांनी छापा मारला.
यावेळी जुगार खेळताना माजी उपसरंपच ईक्रामोद्दीन समसोद्दीन, शहिस्तेखान नय्यीम खान पठाण, अमिर सैय्यद गुलाब, इकबाल शेख लतीफ, रसुलखान नयीमखान यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. विजय पाटील यांच्या फियार्दीवरून वरील पाच जणांविरुद्ध मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामीनावर यांना सोडण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर जुगाऱ्यांच्या ताब्यातून पत्ते,पाच मोबाईल व बारा हजार रोख जप्त केले आहे.
कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकातील विजय पाटील यांना तेथील काही जणांनी विरोध करीत धकाबुक्की केली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच कारवाई दरम्यान जुगाराच्या ठिकाणी पोलिसांनी तलवारही जप्त केल्याचे बोलले जात असून पोलिसांनी तक्रारीत तलवार दाखवली नसल्याने पोलीसांची भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे. तर अवैधधंदे बंद असल्याची वल्गना करणाºया पहूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचा पुरावा या कारवाईने समोर आला आहे.
अवैधधंद्यावाल्याना पाठीशी घालणाºया पोलिसांचा धाक संपुष्टात आल्याचे या घटनेमुळे समोर आले असून पोलीसांसह नागरीकांची सुरक्षा धोक्यात आली असल्याचे बोलले जात आहे.