जळगाव शहरात पोलीस बॉईज व शनी पेठच्या तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 10:23 PM2018-02-25T22:23:13+5:302018-02-25T22:23:13+5:30
पोलीस बॉईज व शनी पेठ पोलीसस्टेशनच्याकार्यक्षेत्रात राहणाºया तरुणांच्या दोन गटात रविवारी दुपारी जोरदार हाणामारी झाली. हातात काठ्या व लोखंडी सळई असल्याने सर्वत्र पळापळ झाली होती. पोलीस मुख्यालयासमोरच तुंबळ हाणामारी झाल्याचे पाहून रस्त्याने जाणाºया पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सर्व तरुणांना ताब्यात घेतले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २५ पोलीस बॉईज व शनी पेठ पोलीसस्टेशनच्याकार्यक्षेत्रात राहणाºया तरुणांच्या दोन गटात रविवारी दुपारी जोरदार हाणामारी झाली. हातात काठ्या व लोखंडी सळई असल्याने सर्वत्र पळापळ झाली होती. पोलीस मुख्यालयासमोरच तुंबळ हाणामारी झाल्याचे पाहून रस्त्याने जाणाºया पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सर्व तरुणांना ताब्यात घेतले.
दरम्यान, ९ जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हाणामारी, दंगल व सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात चंद्रशेखर सदाशिव कोळी (वय २३), राहूल रतिलाल सपकाळे, पंकज हरी तायडे (सर्व रा.शनी पेठ परिसर)व सुदर्शन भिका कोळी रा.पाळधी, ता.धरणगाव तर दुस-या गटातील पोलीस बॉईज निलेश सोपान पाटील (रा.शामराव नगर, आशाबाबा नगर, जळगाव), मोंटू अभिमन्यू इंगळे (रा. पोलीस लाईन दक्षता नगर, जळगाव), राजेश नथ्थू शिंदे (रा.आसोदा, ता.जळगाव), पुष्पक मुकेश पाटील (रा.पोलीस लाईन, दक्षता नगर, जळगाव) यांचा समावेश आहे.
पोलीस मैदानावर धक्का लागल्याचे कारण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटातील तरुण पोलीस कवायत मैदानावर पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी जातात. तेथे पळताना धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन्ही गटात धूसफूस होती, ती आज थेट हाणामारीच्या माध्यमातून उफाळून आली. दरम्यान, पोलीस लाईनमधील तरुणांमध्ये यापूर्वी तीन वेळा हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. निव्वळ पोलिसांची मुले आहेत म्हणून पोलिसांनीही कारवाई करणे टाळले होते. रविवारी तर प्रकरण हाताबाहेरच गेले.स्वत: पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्यासमोर हाणामाºया झाल्या. नियंत्रण कक्षातून क्युआरटी पथकाला पाचारण करुन या तरुणांना ताब्यात घेण्यात आले.