भुसावळात पोलिसांचे कोंबिंग आॅपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 07:30 PM2019-10-09T19:30:28+5:302019-10-09T19:32:58+5:30
भुसावळ शहरात पोलिसांनी बुधवारी पहाटे कोंबिंग आॅपरेशन राबविले. त्यात दोन गावठी कट्टे हस्तगत करून दोन जणांना अटक करण्यात आली.
उत्तम काळे
भुसावळ, जि.जळगाव : शहरात पाच जणांचे हत्याकांड झाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी पहाटे कोंबिंग आॅपरेशन राबविले. त्यात पुन्हा दोन गावठी कट्टे हस्तगत करून दोन जणांना अटक करण्यात आली. पहिली कारवाई बाजारपेठ व शहर पोलिसांनी केली.
शहरातील समता नगर व आरपीडी रोडवर रविवारी गावठी कट्टा त्याचप्रमाणे चॉपरचा वापर करून तब्बल पाच लोकांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात नव्हेतर राज्यात खळबळ उडाली. दरम्यान, हे हत्याकांड घडण्यापूर्वी शहरात सलग दोन दिवस गावठी कट्टे ताब्यात घेऊन चार लोकांना अटक करण्यात आली. त्यामुळे शहरात गावठी कट्ट््याचा महापूर आला की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. पाच जणांच्या हत्याकांडानंतर कायदा व सुव्यवस्थेचे चांगले धिंडवडे निघाले. त्यामुळे ९ रोजी पहाटे शहरात कोम्बिंग आॅपरेशन करून कारवाई केल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या आदेशावरुन बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोबिंग आॅपरेशन करण्यात आले. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे संशयित आरोपी रमाकांत वेडू वाघ (वय ४२, रा.महात्मा फुले नगर, भुसावळ) हा बुधवारी पहाटे साडेतीनला भुसावळ शहरात नाहाटा चौफुली भागात पाण्याच्या टाकीजवळ त्याच्या कब्जात विना परवाना गावटी कट्टा व जिवंत काडतुसह मिळून आले आहे. १५ हजार रुपये किमतीचा एक लोखडी गावठी कट्टा (पिस्तूूल), कट्ट्याच्या दोही बाजूस प्लॅस्टिकचे ग्रीप असलेली व पाच हजार रुपये किमतीच्या एक जिवंत कारतुडसह एकूण २० हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला. आरोपी वाघ याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई डीवाय. एस.पी.गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रावसाहेब कीर्तिकर, पो.हे.काँ.सुनील जोशी, पो.ना. रवींद्र बिºहाडे, रमण सुरळकर, पो.काँ. विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, उमाकांत पाटील, ईश्वर भालेराव, संदीप परदेशी आदींनी केली. तपास पो.हे.काँ.सुनील जोशी करीत आहेत.
प्रभाकर हॉलजवळ कंपनीचे कट्टा हस्तगत
दुसऱ्या कारवाईत शहर पोलीस स्टेशन हद्दीत प्रभाकर हॉलजवळ संशयित आरोपी नितीन समाधान इंगळे (वय २९, रा.सहकारनगर, गुरूद्वारजवळ ) गावठी कट्टा व जिवंत काडतुसे घेऊन आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी शेख साहिल, पो.कॉ. संजय पाटील, जुबेर शेख, सोपान पाटील आदींच्या पथकास सूचना दिल्या. या पथकाने आरोपीस अटक केली. त्याच्याजवळून १५ हजार रुपये किमतीचे मेड इन स्पेन या कंपनीचा कट्टा व जिवंत काडतुसे हस्तगत केली व त्यास अटक केली. यासंदर्भात सोपान पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुपडा पाटील करीत आहे.