भुसावळात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 09:59 PM2020-11-10T21:59:04+5:302020-11-10T22:00:36+5:30
अवैध शस्त्रांचा वापर करून होणारी गुन्ह्यात वाढ तसेच आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोंबिंग रॉबविले.
भुसावळ, जि.जळगाव : शहरात गेल्या काही वर्षापासून अवैध शस्त्रांचा वापर करून होणारी गुन्ह्यात वाढ तसेच आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोंबिंग रॉबविले. ९ रोजी रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यत केलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान शहरातील मागील १० वर्षात अवैध शस्त्रांचा वापर करुन गुन्हा करणाऱ्या सुमारे १२० लोकांच्या घरांची झडती घेण्यात आली. घरझडती अंती कायदेशीर कारवाई करण्यात आली.
विविध गुन्ह्यात फरार असणाऱ्या सुमारे ६० गुन्हेगारांचा शोध घेताना मोहमंद इम्रानअली अब्बासअली, रामअवतार रघुनाथ लोधी, एक महिला आरोपी मिळून आल्याने त्यास अटक करण्यात आली.
याशिवाय संपूर्ण शहरातील तडीपार गुन्हेगार चाचपणी केली. त्यापैकी एक तडीपार शम्मी प्रल्हाद चावरीया हा मिळून आला. त्याच्याविरुध्द कलम १४२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली.
याशिवाय रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयित शेख रईस शेख रशिद, सोहेबखान कलीमखान यांची विचारपूस दरम्यान उड़वा उडवीचे उत्तरे दिली. त्यांच्यावर कलम १२२ खाली गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील सुमारे २५ हिस्ट्रीशिटर तपासून त्यांच्यावर योग्य प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय कोंबिंग ऑपरेशन दरम्यान दारुबंदी प्रतिबंधक कायद्याखाली तीन ठिकाणी छापे टाकून गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. याशिवाय रात्री उशिरा हॉटेल्स/ दुकाने सुरु ठेवणाऱ्या सुमारे सहा दुकानदारावर कलम ३३ खाली कारवाई करण्यात आली, त्यात जाफर रज्जाक गवळी, सद्दाम शेख गफ्फार, मनोज अशोक दास्ताने व अन्य. यांना ताब्यात घेण्यात आले
ऑपरेशन दरम्यान मोटार वाहन कायद्यानुसार सुमारे २३२ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ३६ वाहने विना नंबर प्लेट ची होती पैकी ३ संशयीत मोटर सायकल पोलीस स्टेशनला
जमा करण्यात आलेल्या आहेत.
याशिवाय विविध रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करुन त्यांचेवर सी.आर.पी.सी. ११०, १०७ अन्वये
प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कोबींग ऑपरेशन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक दिलीप भागवत रामकृष्ण कुंभार बाबासाहेब ठोंबे सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्मचारी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेवेगवेगळे पथक तयार करुन त कारवाई करण्यात आली सर्च वॉरंट मिळवून कार्यवाही कामी सहकार्य मिळाले तसेच नगरपालिका कडूनही योग्य ते सहकार्य करण्यात आले.