मुख्यमंत्र्यांच्या जळगावातील लायसन्सबाबत पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 01:58 PM2018-08-01T13:58:44+5:302018-08-01T14:01:26+5:30

परिवहन आयुक्तांनी मागविला खुलासा

Police Complaint about Chief Minister's Jalgaon license | मुख्यमंत्र्यांच्या जळगावातील लायसन्सबाबत पोलिसात तक्रार

मुख्यमंत्र्यांच्या जळगावातील लायसन्सबाबत पोलिसात तक्रार

Next
ठळक मुद्देखळबळमुळ कागदपत्रांची केली तपासणी

विलास बारी
जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने जळगाव आर.टी.ओ. कार्यालयातून तयार केलेल्या बनावट वाहन परवाना प्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा परिवहन आयुक्तांनीही तातडीने खुलासा मागविला. मुख्यमंत्री व केंद्रीय परिवहन मंत्री यांच्या नावाने तयार केलेला परवाना बनावट असल्याचे प्रथमदर्शी स्पष्ट झाले असून मुळ परवाना हा दुसºया व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे.
‘मुख्यमंत्र्यांना जळगाव आर.टी.ओ.कडून ट्रॅक्टरचे लायसन्स’ हे वृत्त ‘लोकमत’मध्ये मंगळवारी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्ह्यासह राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली. सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास परिवहन आयुक्तांनी जळगाव आरटीओ जयंत पाटील यांच्याकडून या प्रकरणाचा खुलासा मागविला.
तत्कालिन कर्मचाºयांचे घेतले जबाब
दोन्ही मान्यवरांच्या नावाने ज्या कालावधीत लायसन्स देण्यात आले आहे, तेव्हा नियुक्त असलेल्या कर्मचाºयांचे जबाब घेण्यात आले आहे. त्यात अनुज्ञप्ती विभागातील बी.डी.लोखंडे, एस.के.वाणी, एस.आर.नारखेडे, सी.एस.इंगळे यांचे जबाब घेतले आहे.
आर.टी.ओ.यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
बनावट लायसन्स तयार करणाºयाविरूद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी मंगळवारी दुपारी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची भेट घेतली. सध्या निवडणूक असल्याने या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन पाटील यांना पोलीस अधीक्षकांनी दिले. या प्रकरणाचा अहवाल परिवहन आयुक्त तसेच जिल्हाधिकाºयांना देखील पाठविला आहे.
रामानंद नगर पोलिसात दिली तक्रार
मुख्यमंत्री व केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या नावाने तयार झालेले वाहन परवाने हे बनावट असल्याची माहिती प्रथमदर्शी समोर आल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे. तसेच या प्रकरणी चौकशी करून संबधिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे.
मुळ कागदपत्रांची केली तपासणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यानावांनी असलेल्या वाहन परवान्याचे मुळ अभिलेख शोधण्यास मंगळवारी सकाळपासूनच सुरुवात झाली. चौकशी दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या नावाने असलेला वाहन परवाना क्रमांक २२३३/२००४ हा नामदेव देवराज यांच्या नावाने आढळून आला. तर नितीन गडकरी यांच्या नावाने असलेला वाहन परवाना क्रमांक १२३४/२००४ हा भडगाव तालुक्यातील आमोदे येथील ईश्वर पाटील यांच्या नावाने असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली तत्काळ दखल
मुख्यमंत्री व केंद्रीय परिवहन मंत्री यांच्या लायसन्सबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकराची माहिती मागविली. तसेच परिवहन आयुक्त कार्यालयाला या संदर्भात ‘लोकमत’कडे खुलासा प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार परिवहन आयुक्तांनी खुलासा सादर केला. मुळ लायसन्स हे नामदेव देवराज व ईश्वर पाटील यांच्या नावे असल्याचे सांगितले आहे. अज्ञात व्यक्तीने बनावट लायसन्स तयार केले असून याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. जळगाव आर.टी.ओ.कार्यालयात ४ जानेवारी २००७ पासून स्मार्ट कार्ड स्वरुपात लायसन्स प्रणाली कार्यान्वित केल्याचे कळविले आहे.
बनावट लायसन्सचा शोध घेण्याचे आव्हान
मुख्यमंत्री व केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या नावाने बनावट लायसन्स तयार केल्याची घटना उघड झाल्यानंतर अशाच प्रकारे अनेक बनावट लायसन्स तयार झाले नसतील हे कशावरून. उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस विभागापुढे असे बनावट लायसन्स शोधून काढण्याचे आव्हान आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणे आवश्यक आहे.

Web Title: Police Complaint about Chief Minister's Jalgaon license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.