धुळे येथील शिवसेना महानगरप्रमुखासह दोघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 10:42 PM2018-06-14T22:42:14+5:302018-06-14T22:42:14+5:30
धुळे येथील शिवसेनेचे महानगरप्रमुखतथा नगरसेवक सतीश दिगंबर महाले व विनायक वालचंद शिंदे या दोघांनी फिर्यादी दिनेश विकास ठाकरे याच्या नावाने बॅँकेत खाते उघडले तसेच त्याच्या नावावरच मोबाईल सीम कार्ड घेत त्याद्वारे ५० लाख रुपये मोबाईल बॅँकींगद्वारे आॅनलाईन ट्रान्सफर केल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीत समोर आला आहे.
जळगाव : धुळे येथील शिवसेनेचे महानगरप्रमुखतथा नगरसेवक सतीश दिगंबर महाले व विनायक वालचंद शिंदे या दोघांनी फिर्यादी दिनेश विकास ठाकरे याच्या नावाने बॅँकेत खाते उघडले तसेच त्याच्या नावावरच मोबाईल सीम कार्ड घेत त्याद्वारे ५० लाख रुपये मोबाईल बॅँकींगद्वारे आॅनलाईन ट्रान्सफर केल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीत समोर आला आहे. दरम्यान, महाले व शिंदे यांना गुरुवारी जळगाव येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील पिंप्री येथील दिनेश विकास ठाकरे (वय २४, ह.मु.रामबोरीस, ता.धुळे) या ऊस तोड करणाऱ्या मजुराच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन सतीश महाले व विनायक शिंदे या दोघांनी तुला २५ लाख रुपये मिळवून देतो असे सांगून त्याच्या मालकीची इनामी जमीन धुडकू मोरे यांच्या नावाने घेतली. तर महाले याने करारनामा केला. सुरत ते नागपूर महामार्गावरील उड्डाणपुलासाठी ही जमीन शासनाने भूसंपादन केली होती. त्याची २ कोटी ८० लाख रुपये इतकी रक्कम ठाकरे याच्या बॅँक खात्यात जमा झाली. शिंदे व महाले या दोघांनी ठाकरे याचे धुळे येथील बॅँकेत खाते उघडले. त्याचे पासबुक, धनादेश पुस्तक स्वत:जवळच ठेवले. त्यानंतर धनादेशावर त्याच्या सह्या घेऊन प्रत्येकी ७५ लाख याप्रमाणे दीड कोटी रुपये काढले आहे.