रसलपूर येथील गुरांची अवैध कत्तल व मांस वाहतूक करणाऱ्या सहा आरोपींना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 05:15 PM2019-04-06T17:15:00+5:302019-04-06T17:15:55+5:30
अवैध मांस वाहतूक करणाऱ्या वाहनास जाळल्याप्रकरणी ११ आरोपींची जामिनावर सुटका
रावेर : तालुक्यातील रसलपूर येथे गुरांची अवैध कत्तल व मांस वाहतूक करणाºया सहा आरोपींना पोलीस कोठडी तर अवैध मांस वाहतूक करणाºया वाहनास जाळल्याप्रकरणी ११ आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली.
रसलपूर येथील शेख जमील शेख अय्युब, शेख कलाम शेख नजीर, शेख शकील शेख नुरा, शेख अफसर शेख हसन, शेख हुसेन शेख हसन हे अवैध कत्तल केलेले आठ क्विंटल मांस घेऊन बºहाणपूर येथे एमपी-६८-पी-०१३७ या वाहनाने जात होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील गतिरोधकावरून दणका बसल्याने रिक्षास्टॉपपासून ते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पुढे शेख अजिज शेख शिराजोद्दीन यांच्या घरापर्यंत गोमांसाच्या पाच ते सहा थैल्या निसटून पडल्या. ही घटना गुुरुवारी सकाळी घडली होती. संतप्त जमावाने सदर गाडीचा चालक शे वसीम शे इस्माईल रा मदिना कॉलनी, रावेर यास बदडले.ा तो जमावाच्या गोंधळाचा फायदा घेऊन पसार झाला होता. म्हणून संतप्त जमावाने अवैधरीत्या गोमांस वाहतूक करणाºया वाहनास आग लावून पेटवून दिले होते.
पोलिसान्ांी घरोघरी शोध घेवून आरोपींचे अटकसत्र राबवले. पसार झालेला वाहनचालक आरोपी शेख वसीम शेख इस्माईल (वय ३०) रा.मदिना कॉलनी, रावेर व गाडीमालक शेख शकुर उर्फ कालू शेख हुसेन (वय ३२) रा.बंडू चौक, रावेर यांना रावेर पोलिसात दाखल गुन्ह्यात गुरूवारी रात्रीच अटक करण्यात आली होती. दोन्ही आरोपींना पोलिसांनी थर्ड डिग्री दाखवताच त्यांनी रसलपूर येथील बेकायदेशीररित्या गोवंश हत्या करून मांसविक्री करणाºया शेख जमील शेख अय्युब (वय २८), शेख शकील शेख नुरा (वय ४१), शेख अफसर शेख हसन (वय २८), शेख हुसेन शेख हसन यांचेकडून सदरील मांस खरेदी केल्याची व बºहाणपूर येथे लग्नासाठी एका एजंटला विकल्याची कबुली दिली. त्या अनुषंगाने रसलपूर येथील बेकायदेशीर कत्तलखाना चालवून मांसविक्री करणाºया शेख जमील शेख अय्युब (वय २८), शेख शकील शेख नुरा (वय ४१), शेख अफसर शेख हसन (वय २८), शेख हुसेन शेख हसन (सर्व रा.रसलपूर) यांना रावेर पोलिसांनी अटक केलीे.
दरम्यान, वाहनास पेटवल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या दुसºया गुन्ह्यातील आरोपी बक्षीपूर येथील ग्रा.पं.सदस्य स्वप्नील मनोहर पाटील व प्रल्हाद संतोष महाजन वगैरे ११ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना रावेर फौजदारी व दिवाणी न्यायालयात शनिवारी हजर केले असता पहिल्या गुन्ह्यातील पाच आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर दुसºया गुन्ह्यातील ११ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. पहिल्या गुन्ह्यात तपासाधिकारी म्हणून फौजदार नाझीम शेख यांनी तर दुसºया गुन्ह्यात तपासाधिकारी म्हणून फौजदार अमृत पाटील यांनी काम पाहिले.