तोतया पोलीस अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 09:30 PM2019-07-08T21:30:13+5:302019-07-08T21:30:50+5:30
चोपडा : अंकलेश्वर बुºहाणपूर महामार्गावर उभे राहून दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची लुबाडणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला ७ जुलै रोजी रंगेहात ...
चोपडा : अंकलेश्वर बुºहाणपूर महामार्गावर उभे राहून दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची लुबाडणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला ७ जुलै रोजी रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे.
७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चोपडा-शिरपूर रस्त्यावर चहार्डी फट्याजवळ एक तोतया पोलीस येणाºया जाणाºया दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडे वाहन परवाना व कागदपत्रांची मागणी करीत होता. ही माहिती गलवाडे, ता.चोपडा येथील होमगार्ड संदीप लक्ष्मण सोनवणे यांनी मोबाईलवरून पोलीस नाईक प्रदीप राजपूत यांना दिली. त्यानंतर पोलिस नाईक प्रदीप राजपूत व ज्ञानेश्वर जवागे बातमीची शहानिशा करण्यासाठी चहार्डी फाट्याजवळ पोहचले. तेव्हा एक अनोळखी व्यक्ती चारचाकी गाडी थांबवून चालक सागर साहेबराव गजरे, रा.चहार्डी त्याच्यांकडे वाहन चालविण्याचा परवाना व कागदपत्रांची मागणी करताना दिसून आला. त्याला पोलिसांनी विचारणा केली असता त्याने भिकन पंडित शर्मा, रा. तलाव गल्ली, पारोळा असे त्याचे नाव सांगितले. तत्काळ पोलिसांनी त्यास अटक केली. त्याच्या खिशात आधारकार्ड, लायसन्स, होमगार्ड ड्रेसवरील फोटोचे ओळखपत्र तसेच ४५० रुपये रोख आढळून आले. यावेळी त्याच्याकडे असलेली दुचाकी (क्रमांक एमएच-१९-सीके-५६९२) पोलिसांनी जप्त केली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात भाग-५ गुरनं.१०६/२०१९ भादंवि कलम ४१९, १७० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मधुकर पवार करीत आहेत.