चौका-चौकात पोलिसांचा बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:30 AM2021-03-13T04:30:24+5:302021-03-13T04:30:24+5:30
जळगाव - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी शुक्रवारपासून जनता कर्फ्यूच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. शहरातील चौका-चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. दरम्यान, विनाकारण ...
जळगाव - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी शुक्रवारपासून जनता कर्फ्यूच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. शहरातील चौका-चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. दरम्यान, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी प्रसादही दिला़
गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग वेगाने वाढतोय़ याला रोखण्यासाठी शुक्रवारपासून तीन दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. शुक्रवारी त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. चौका-चौकात विविध पोलीस ठाण्यातील कर्मचारी व शहर वाहतूक पोलीस तैनात होते. ये-जा करणाऱ्यांची चौकशी पोलिसांकडून होत होती. सुभाष चौकात विनाकारण फिरणाऱ्या रिक्षा चालकाला पोलिसाने प्रसादही दिला. रात्री उशिरापर्यंत टॉवर चौक, शिवतीर्थ मैदान, चित्रा चौक, स्वातंत्र्य चौक, बहिणाबाई उद्यान, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, भिलपुरा चौक परिसर व सुभाष चौक परिसरात पोलिसांचा बंदोबस्त होता. विनाकारण फिरणाऱ्यांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.