पोलीस दलात बदल्यांचे वारे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:17 PM2018-04-19T13:17:16+5:302018-04-19T13:17:16+5:30
सुनील पाटील
जिल्हा पोलीस दलात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. मे महिना तसा बदल्यांचाच असतो. जिल्हा पोलीस दलात साडे तीन हजार पोलीस कर्मचारी आहेत. दरवर्षी दहा टक्के बदल्या होतात. त्यात प्रशासकीय तर काहींच्या विनंती बदल्या असतात. अशा बदलीपात्र कर्मचाºयांची यादी तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाºयांनी पसंतीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी आपआपल्या पध्दतीने फिल्डींग लावली आहे. पोलीस दलात अधिकाºयांच्या बदलीचा इतका त्रास होत नाही, त्याहीपेक्षा कर्मचारी बदलीत पोलीस अधीक्षकांना होतो. आमदारापासून तर मंत्र्यांपर्यंतच्या शिफारशी या बदल्यात होतात. शिफारशीनेही काम झाले नाही तर थेट मंत्र्यांनाच फोन करायला भाग पाडले जाते. प्रत्येक बदलीत कोणाचा अन् कोणाचा तरी कुठे ना कुठे स्वार्थ दडलेला असतो.
पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी गेल्या वर्षी बदली प्रक्रियेत राजकीय दबाव झुगारुन लावला होता. राजकीय दबाव आणणाºया कर्मचाºयाची इच्छीतस्थळी बदली न करता दुसºयाच ठिकाणी बदली केल्याचे काही किस्से घडले होते. यातून कराळे यांनी शिस्तीची जाणीव करुन दिली होती. कराळे यांची पदोन्नती झालेली आहे, त्यामुळे केव्हाही त्यांच्या बदलीचे आदेश येऊ शकतात. नवीन अधीक्षक कोण व कसा असणार याची चिंता बदलीपात्र कर्मचाºयांना लागली आहे. त्यामुळे कराळे यांच्या काळात बदलीचे गॅझेट निघाले तर काही अंशी मनासारखी बदली मिळेल अशी अपेक्षा काही कर्मचाºयांना आहे.
कर्मचाºयांप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, भुसावळचे सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल व सहा पोलीस निरीक्षक बदलीस पात्र आहेत. या सर्वांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. पोलीस अधीक्षक कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व निलोत्पल हे पदोन्नतीने बदलून जाणार आहेत. पोलीस स्टेशनचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या प्रभारी अधिकाºयांच्याही महिनाभरात बदल्या होणार आहेत. सहायक निरीक्षक प्रभारी असलेल्या पोलीस ठाण्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय जळगाव उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे यांचाही काही महिन्यात कार्यकाळ पूर्ण होणार आहे.
आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता त्यांच्या काळात ही निवडणूक होती की त्यापूर्वीच त्यांची बदली होते याकडेही शहरातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. एप्रिल ते जून असे तीन महिने कर्मचारी व अधिकारी यांच्या बदलीचा काळ असतो. पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस महासंचालक अशा तीन टप्प्यात बदल्या होतात.