पोलीस दलाला मिळणार नवी वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:50 AM2021-02-05T05:50:56+5:302021-02-05T05:50:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा पोलीस दलात लवकरच नवीन चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा ताफा दाखल होणार आहे. ...

The police force will get new vehicles | पोलीस दलाला मिळणार नवी वाहने

पोलीस दलाला मिळणार नवी वाहने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा पोलीस दलात लवकरच नवीन चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा ताफा दाखल होणार आहे. जिल्हा नियोजन समितीने याला परवानगी दिली आहे. या माध्यमातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस विभागाला दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केली असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २९ चारचाकी व ७० मोटार सायकली विकत घेण्यास परवानगी दिली आहे.

जळगाव जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी संख्येच्या तुलनेत दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या ही खूप कमी आहे. यातच सद्याची अनेक वाहने ही जुनी असल्याने त्यांची वारंवार करण्यात येणारी डागडुजी ही डोकेदुखी ठरत असते. याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पोलीस दलासाठी नवीन चारचाकी आणि दुचाकी वाहनांची आवश्यकता असल्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती. याला पालकमंत्र्यांनी तात्काळ होकार दिला होता. मध्यंतरी कोविडच्या आपत्तीमुळे अन्य कामांच्या खर्चावर मर्यादा होती. आता ही मर्यादा दूर झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी तातडीने वाहन खरेदीला मंजुरी मिळवून दिली आहे.

जिल्हा नियोजन समितीने आज २९ चारचाकी (बीएस-४) आणि ७० होंडा शाईन दुचाकींना खरेदीची मंजुरी दिली आहे. यासाठी २ कोटी ३० लाख ९६ हजार ४७८ रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

Web Title: The police force will get new vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.