निंबोल दरोड्यातील आरोपींची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी जाहीर केले एक लाखाचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 03:07 PM2019-07-15T15:07:34+5:302019-07-15T15:09:22+5:30

रावेर तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेत दरोड्याच्या प्रयत्नात व्यवस्थापकाच्या झालेल्या खूनप्रकरणी आरोपीची माहिती देणाºयास जळगाव पोलिसांनी अखेर एक लाख रुपये इनाम घोषित केले आहे.

Police have announced a reward of Rs one lakh for those who provided information about the accused in the Nimbolan Dock | निंबोल दरोड्यातील आरोपींची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी जाहीर केले एक लाखाचे बक्षीस

निंबोल दरोड्यातील आरोपींची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी जाहीर केले एक लाखाचे बक्षीस

Next
ठळक मुद्देनिंबोल येथील विजया बँक दरोड्याच्या प्रयत्नात व्यवस्थापकाच्या हत्येचा मारेकरी अद्याप मोकाटचतिनो मुलको की पुलीस ‘डॉन’ का पिछा कर रही है, लेकीन डॉन को पकडना मुश्किलही नही नामुमकीन लगता हैदरोडा-खुनाच्या घटनेस होणार आता एक महिना

किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेत दरोड्याच्या प्रयत्नात व्यवस्थापकाच्या झालेल्या खूनप्रकरणी आरोपींची  माहिती देणाºयास जळगाव पोलिसांनी अखेर एक लाख रुपये इनाम घोषित केले आहे.
निंबोल येथील विजया बँकेत दोन हेल्मेटधारी मोटारसायकलस्वार दरोडेखोरांनी दरोड्याच्या प्रयत्नात सहाय्यक शाखा व्यवस्थापक करणसिंग नेगी यांची गोळी झाडून निर्घृण हत्या करून पोबारा केला होता. साधारणपणे एक महिन्यापूर्वी १८ जून रोजी दुपारी २:२० वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.
दिवसाढवळ्या ग्रामीण भागातील बँकेत दरोडेखोरांनी शिरकाव करून थेट गोळीबार करण्याची खळबळजनक घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रोहम यांनी घटनास्थळी धाव घेऊन दरोड्याच्या प्रयत्नात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील सर्व कंगोरे तपासण्यासाठी तब्बल ७२ तास ठिय्या मारून नियोजनबद्ध बैठका घेऊन तपासचक्र फिरवले.
एव्हाना, नाशिक विभाग, अमरावती विभागातील स्थानिक गुन्हे शाखेच्या निष्णात पोलीस पथकांची नियुक्ती करून तथा मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेश पोलिसांशी समन्वय साधून व तपासासाठी तब्बल महिनाभरापासून थेट विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे यांच्याकडून तपासाचे चक्र फिरवत मागोवा घेतला जात असला तरी, सदर प्रकरणी अद्यापही तपासाचा धागा गवसलेला नाही.
या घटनेतील हेल्मेटधारी मोटारसायकलस्वार एक दरोडेखोर विजया बँक शाखेत एक दिवस आधी हेरगिरी करून गेल्याचे आढळून आले आहे. संबंधित आरोपींनी घटनेच्या पूर्वीपासून तर थेट पसार होईपर्यंत मोबाइलचा वापर न करण्याची खबरदारी घेतल्याने सदरील आरोपी सर्राईत तथा व्यावसायिक असल्याचा पोलिसांचा एक मतप्रवाह दिसून येतो, तर आरोपींनी बँकेतून रक्कम लंपास न करताच पलायन करताना झाडलेल्या गोळीत सहाय्यक शाखा व्यवस्थापक करणसिंग नेगी यांची हत्या झाल्याने सदरील आरोपी हे सराईत नसल्याचा पोलिसांचा दुसरा मतप्रवाह आहे.
मोबाइलच्या ध्वनीलहरींच्या कार्यक्षेत्रात आरोपींचा कोणताही संपर्क आढळून येत नाही, तर मयताच्या मोबाइल कॉल रेकॉर्डमध्ये कोणताही धागा गवसत नसल्याने पोलीस तपासात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉन या हिंदी चित्रपटातील ‘ग्यारह मुलको की पुलीस डॉन का पिछा कर रही है, लेकीन डॉन को पकडना मुश्किल ही नही नामुमकीन है’ या संवादफेकीला जनसामान्यांमधून उजाळा दिला जात आहे.
अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंंजाबराव उगले यांनी निंबोल बँक दरोड्याच्या प्रयत्नात खून करणाºया आरोपीचे नाव निंभोरा पोलिसात वा स्थानिक गुन्हे शाखेला कळवणाºयास एक लाख रुपये इनाम घोषित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

Web Title: Police have announced a reward of Rs one lakh for those who provided information about the accused in the Nimbolan Dock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.