पोलीस मदत केंद्रालाच मदतीची गरज
By admin | Published: February 15, 2017 12:29 AM2017-02-15T00:29:39+5:302017-02-15T00:29:39+5:30
पोलिसांअभावी पडलेय ओस : कजगाव आणि परिसराची सुरक्षा वा:यावर, दखल घेण्याची मागणी
कजगाव, ता. भडगाव : गेल्या 22 वर्षापूर्वी स्थापन झालेले कजगावचे पोलीस मदत केंद्र पोलिसांविना ओस पडू पाहत आहे. या केंद्रावर कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करून कर्मचारी चौकीवर आहेत की नाही याची अधिका:यांनी नियमित चौकशी करावी अशी मागणी कजगाव व्यापारी असोसिएशनने केली आहे.
गेल्या 22 वर्षापूर्वी नागरिकांच्या ठोस मागण्यांमुळे कजगावला पोलीस मदत केंद्र मंजूर झाले होते. या केंद्रावर चार पोलिसांची नियुक्तीही झाली होती. पोलीस मदत केंद्र सुरू झाल्याने परिसरात होणा:या चो:यांवरही आळा बसला. तसेच दारू पिऊन धिंगाणा घालणा:यांनादेखील चांगलाच चाप बसल्याने शांतता निर्माण झाली होती.
कजगाव महत्त्वपूर्ण गाव
भडगाव तालुक्यातील भडगावप्रमाणेच महत्त्वपूर्ण असलेल्या कजगाव येथे रेल्वे स्टेशन आहे. बरोबरच केळी व कापसाची मोठी बाजारपेठ असल्याने केळी, कापूस घेणा:या व्यापा:यांची येथे ये-जा असते, तर परिसरातील 40 खेडय़ांमधून कापूस व केळी कजगावच्या बाजारपेठेत येते. यामुळे या व्यवसायातून मोठी उलाढाल येथे दररोजची असते. मात्र सुरक्षा वा:यावर असल्याचे चित्र आहे.
कायमस्वरूपी नेमणूक गरजेची
रेल्वे स्टेशन असण्याबरोबरच 10 कि.मी.वर जिल्हा हद्द बदलत असलेल्या या गावास सुरक्षा महत्त्वाची आहे. व्यापारी उलाढाल हादेखील एक महत्त्वाचा भाग आहे. या सर्वच बाबींकडे जिल्हा पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर, सहायक पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी तत्काळ लक्ष देऊन कजगाव मदत केंद्रावर एक फौजदार, दोन हेड कॉन्स्टेबल व चार कॉन्स्टेबल अशी नेमणूक करावी. यात रात्रपाळीसाठी कायमस्वरुपी दोन तसेच दिवसा दोन कॉन्स्टेबलची नेमणूक करावी व चौकीवर कर्मचारी आहेत किंवा नाही याची चौकशी करावी, अशीही मागणी आहे.
औट पोस्टसाठी आमदारांनी लक्ष द्यावे
व्यापार दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या कजगावात पोलीस मदत केंद्र देण्यात आले आहे. या मदत केंद्राचे रूपांतर शासन दरबारी ठोस पाठपुरावा करून औट पोस्टमध्ये करावा.
हे केंद्र औट पोस्ट झाल्यास नियमानुसार कर्मचा:यांची संख्यादेखील वाढेल. याबाबीकडे आमदार किशोर पाटील यांनी गांभीर्याने लक्ष घालून औट पोस्टसाठी शासन दरबारी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
भडगाव पो.स्टे.अंतर्गत एक कोळगाव औट पोस्ट व दुसरे कजगाव मदत केंद्र असून या मदत केंद्रास गिरणा नदीच्या अलीकडील 15 गावे जोडण्यात आली. यात नावरे, वाडे, दलवाडे, गोंडगाव, बांबरुड, लोण, बोरनार, बोदर्डे, कनाशी, पासर्डी, कजगाव, भोरटेक, तांदूळवाडी, मळगाव, देव्हारी या गावांचा समावेश करून मदत केंद्राचा परिसर वाढविण्यात आला. म्हणजेच कोळगाव औट पोस्टचा अर्धा भाग कजगाव चौकीला जोडण्यात आला.