जलपुनर्भरणासह पर्यावरण संवर्धनासाठी पोलिसांचा पुढाकार

By विजय.सैतवाल | Published: June 26, 2024 11:22 PM2024-06-26T23:22:13+5:302024-06-26T23:23:17+5:30

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या नुतणीकरणात  रेन वॉटर हार्वेस्टिंगसह वृक्षारोपण

police initiative for environmental conservation including water recharge | जलपुनर्भरणासह पर्यावरण संवर्धनासाठी पोलिसांचा पुढाकार

जलपुनर्भरणासह पर्यावरण संवर्धनासाठी पोलिसांचा पुढाकार

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अंमलदार कक्षाचे लोकसहभागातून नुतनीकरण करण्यात आले असून हे काम करताना पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर देण्यात आला. भूजल पातळी वाढावी यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगसह वृक्षारोपणदेखील करण्यात आले. या अंमलदार कक्षाचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, दुय्यम अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. पोलिस ठाण्याच्या नुतनीकरणासाठी उद्योजकांचे सहकार्य लाभले.

चंद्रकांत नाईक, घनश्याम पाटील, संजय ठाकरे, दीपक चौधरी, रवीकिरण कोंबडे, धनंजय जहुरकर, मनोज अडवाणी, संदीकादत्त मिश्रा, पद्मनाभन अय्यंगर, संजय व्यास, सुनील मंत्री, महेश प्यारपियानी, राजेश अग्रवाल, चेतन चौधरी, मनीष अग्रवाल, माजी नगरसेवक मनोज अहुजा यांचे सहकार्य लाभले. आर्किटेक मनोज पिट्रोदा यांचे मार्गदशन लाभले. यावेळी काम करणाऱ्या कामगारांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: police initiative for environmental conservation including water recharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस