प्रकृती अत्यावस्थ झालेल्या महिलेचा प्राण वाचविण्यासाठी मदतीला धावले पोलीस निरिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 11:34 PM2019-12-04T23:34:36+5:302019-12-04T23:46:56+5:30
जळगाव - विषारी औषध प्राशन केल्यामुळे प्रकृती अत्यावस्थ झालेल्या महिलेला रूग्णालयात नेणाऱ्या वाहनाचे टायर फुटले. त्याचवेळी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील ...
जळगाव- विषारी औषध प्राशन केल्यामुळे प्रकृती अत्यावस्थ झालेल्या महिलेला रूग्णालयात नेणाऱ्या वाहनाचे टायर फुटले. त्याचवेळी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक रणजीत ठाकूर यांच्या तो प्रकार लक्षात येताच त्यांनी क्षणाचा विलंब न करता पर्याची वाहनाची व्यवस्था करून महिलेचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न केले़ त्यामुळे सर्वस्तरातून त्यांचे कौतूक होत आहे.
बुधवारी जामनेर येथील लोंड्रीतांडा येथील संजना विनोद राठोड या महिलेने विषारी औषध प्राशन केले़ त्यानंतर त्या महिलेस चारचाकी वाहनातून जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेत असताना अचानक वाहनाचे टायर फुटले़ दरम्यान, हा प्रकार वाटेतून जात असलेले एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांच्या लक्षात आले़ त्यांनी त्वरित त्याठिकाणी धाव घेवून पर्यायी वाहनाची व्यवस्था करून त्वरित महिलेला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले़ दरम्यान, महिलेचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे पोलीस दलातून त्यांचे कौतूक होत आहे.