जळगावात वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:21 PM2018-09-14T13:21:50+5:302018-09-14T13:26:55+5:30

अजिंठा चौकातील घटना

Police in Jalgaon get hold of a traffic collar | जळगावात वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून मारहाण

जळगावात वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून मारहाण

Next
ठळक मुद्देरस्त्यावर हटकल्याचा आला रागचौघांना तत्काळ अटक

जळगाव : वाहतुकीला अडथळा निर्माण करु नका असे बोलल्याचा राग आल्याने अरशद कासम गवळी (वय २९) या शहर वाहतूक शाखेच्या पोलिसाला अश्लिल शिवीगाळ करीत कॉलर पकडून चौघांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे सात वाजता अजिंठा चौकात घडली.
याप्रकरणी गणेश प्रकाश चौधरी, महेंद्र अशोक महाजन (रा.कालिंका माता चौक, जळगाव), हेमंत संजय खैरनार (रा.विठ्ठल पेठ, जळगाव)व निलेश उखा पवार (रा.अयोध्या नगर, जळगाव) यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील व सहकाऱ्यांनी या चौघांना अटक केली. तपास पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव करीत आहेत.
वाहतुकीचा खोंबळा होत असल्याने हटकले
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गणेशाची स्थापनानिमित्त मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता गुरुवारी अजिंठा चौकात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता. शहर वाहतूक शाखेचे राहूल कुमावत, अरशद गवळी, गजानन राठोड व मदन पावरा हे ड्युटीवर असताना गवळी यांनी भुसावळ येथे जाणाºया रिक्षा थांब्यावर गर्दी करत असलेल्या चार तरुणांना वाहतूकीला खोळंबा होत असल्याने इथे थांबू नका असे सांगितले असता त्याचा राग आल्याने गणेश चौधरी याने तु कोण आम्हाला सांगणारा असे म्हणत अश्लिल शिविगाळ करीत गवळी यांची कॉलर पकडली व तोंडावर बुक्का मारला. तर महेंद्र महाजन, हेमंत खैरनार व निलेश पवार यांनीही गवळी यांना पकडून मारहाण केली.
हा प्रकार पाहिल्यानंतर गवळी यांना अन्य सहकाºयांनी मारहाणकर्त्यांच्या तावडीतून सोडविले या चौघांविरुध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे चौकात प्रचंड गर्दी झाली होती.

Web Title: Police in Jalgaon get hold of a traffic collar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.