नोकरीचे आमिष दाखवून एक लाखाची फसवणूक करणाºया पोलिसांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:15 PM2018-03-14T13:15:49+5:302018-03-14T13:15:49+5:30
आॅनलाइन लोकमत
अमळनेर, जि. जळगाव, दि. १४ - मुंबई महानगर पालिकेत सुरक्षा रक्षकांच्या नोकरीचा बनावट आदेश देऊन एक लाख रुपये उकळणाºया दोन पोलिसांसह तिघांना अटक करण्यात आली असून आरोपींना न्यायालयाने १७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तांबेपुरा येथील परेश लक्ष्मण सोनवणे याला मुंबई महानगर पालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी लावून देतो असे सांगून पो.कॉ. राजदीप भिकन मोरे , पो कॉ महेंद्र भगवान पाटील (एरंडोल) व सतीश भिकन मोरे या तिघांनी एक लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा करायला सांगितले. त्यानंतर बनावट नियुक्ती पत्र दिले. नियुक्ती पत्रात दिलेल्या तारखेला प्रशिक्षणासाठी परेश हजर व्हायला गेला असता तेथे कुठलेच प्रशिक्षण नव्हते. त्यामुळे त्यांनी महानगर पालिकेच्या संबंधित अधिकाºयांना आदेशाबाबत चौकशी केली असता अशी कुठलीही भरती झालेली नाही. हा आदेश बनावट असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी आरोपीना जाब विचारला. याबाबत अमळनेर पोलिसात 27 जुलै २०१७ रोजी परेश सोनवणे यांनी फिर्याद दिल्यावरून तिघांविरुद्ध भादवी 420, 471, 465, 468, 409, 34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचा तपास स.पो.नि.एकनाथ ढोबळे यांनी केला. आरोपीना 12 मार्च रोजी रात्री अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्या. अतुल कुलकर्णी यांनी तिघां आरोपीना 17 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस रक्कम हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.