जळगावात एमआयडीसी पोलीस स्टेशनचा पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:19 PM2018-11-21T12:19:44+5:302018-11-21T12:20:57+5:30

आरोपी न करण्यासाठी मागितली लाच

Police of MIDC police station in Jalgaon get trapped in ACB | जळगावात एमआयडीसी पोलीस स्टेशनचा पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात

जळगावात एमआयडीसी पोलीस स्टेशनचा पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात

googlenewsNext
ठळक मुद्देदुसरी कारवाई जिल्हा रुग्णालयातून केली अटक

जळगाव : बुट चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी १५ हजाराची लाच मागणी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संदीप भगवान पाटील (वय ३६, रा.पिंप्राळा परिसर,जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री ९.३० वाजता काशिनाथ हॉटेल परिसरातून अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनलाच पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात १२ नोव्हेंबर रोजी वॉरंटात जामिनावर सोडल्याच्या बदल्यात पाच हजाराची मागणी केल्या प्रकरणी याच पोलीस स्टेशनचा हवालदार दयाराम देवराम महाजन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा रुग्णालयातून अटक केली होती. त्यानंतर लाच मागणीची ही दुसरी कारवाई आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस स्टेशनला बुट चोरी प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यात काही आरोपींना अटकही झालेली आहे. तक्रारदार यांना या गुन्ह्यात अटक करु नये यासाठी संदीप पाटील यांनी ६ रोजी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत पाटील यांनी लाच मागितल्याचे सिध्द झाले. त्यानुसार मंगळवारी रात्री एमआयडीसीतील काशिनाथ हॉटेल परिसरात पानटपरीवर लाच घेण्याच्या प्रयत्नात असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक निलेश लोधी व सहकाऱ्यांनी सापळा रचून पाटील यांना अटक केली.

Web Title: Police of MIDC police station in Jalgaon get trapped in ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.