संवेदनशील भागात पोलिसांचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:24 AM2021-09-10T04:24:44+5:302021-09-10T04:24:44+5:30
जळगाव : शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी शहरातील संवेदनशील भागात पोलिसांचे संचलन करण्यात आले. जिल्हा ...
जळगाव : शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी शहरातील संवेदनशील भागात पोलिसांचे संचलन करण्यात आले. जिल्हा पेठ, जळगाव शहर, एमआयडीसी व शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथसंचलन झाले. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी चांडक व शहरातील सर्व प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी यात सहभागी झाले होते.
भिलपुरा पोलीस चौकी पासून पथसंचलन सुरू झाले. संमिश्र लोकवस्ती व संवेदनशील भागातून संचलन झाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे सात वाजता सांगता झाली. यात जळगांव शहरचे एक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक व २० कर्मचारी, शनिपेठचे पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक व २५ कर्मचारी सहभागी होते.