पोलीस भरतीची तयारी करणा-या दोघांनीच लुटले फायनान्स कर्मचाºयाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 04:45 PM2018-02-25T16:45:35+5:302018-02-25T16:46:11+5:30

बळीराम पेठेतील जनलक्ष्मी फायनान्स कंपनीच्या कृषी बचत गटाचे हप्ते वसूल करुन येणा-या विजय धनराज बारी (वय २२ रा.जुना खेडी रोड, जळगाव) या कर्मचा-याला लुटणा-या विनोद मच्छिंद्र पाटील (वय २६) व सागर सदाशिव गरुड (वय २३) दोन्ही रा.बांबरुड राणीचे, ता.पाचोरा दोघांना एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अटक केली. चार महिन्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. दरम्यान, दोघंही तरुण पोलीस भरतीची तयारी करीत आहेत.

 Police officer recruited by both of them have looted the finance employee | पोलीस भरतीची तयारी करणा-या दोघांनीच लुटले फायनान्स कर्मचाºयाला 

पोलीस भरतीची तयारी करणा-या दोघांनीच लुटले फायनान्स कर्मचाºयाला 

Next
ठळक मुद्देवडली-वराड रस्त्यावर झाली होती लूटचार महिन्यानंतर गुन्हा उघड गुंतवणूकदारांची पैसे गेले होते

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २५ : बळीराम पेठेतील जनलक्ष्मी फायनान्स कंपनीच्या कृषी बचत गटाचे हप्ते वसूल करुन येणा-या विजय धनराज बारी (वय २२ रा.जुना खेडी रोड, जळगाव) या कर्मचा-याला लुटणा-या विनोद मच्छिंद्र पाटील (वय २६) व सागर सदाशिव गरुड (वय २३) दोन्ही रा.बांबरुड राणीचे, ता.पाचोरा दोघांना एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अटक केली. चार महिन्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. दरम्यान, दोघंही तरुण पोलीस भरतीची तयारी करीत आहेत.
तालुक्यातील वडली-वराड रस्त्यावर ९ आॅक्टोबर २०१७ रोजी दुचाकीवरुन आलेल्या तीन जणांनी विजय बारी यांना बेदम मारहाण करुन त्यांच्याजवळील १ लाख १४ हजाराच्या रोकडसह लॅपटॉप व अन्य साहित्य असा १ लाख ४६ हजार ३३० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली होती.  याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुंतवणूकदारांची पैसे गेले होते
लोणवाडी तांडा येथून सुनिता राठोड यांच्या गटाकडून २१ हजार ३०० रुपये, राखीबाई गोविंदा धाडी यांच्यागटाकडून १९ हजार १७०, लालचंद चव्हाण यांच्याकडून २१ हजार २००, धारा राठोड यांच्या गटाकडून १९ हजार ८०, गणेश तवर गटातील दिलीप चव्हाण यांच्याकडून १४ हजार ९९० असे एकुण ९५ हजार ६६० रुपये घेतले. तर आधीचे १९ हजार १७० रुपये जवळ होते. ही सर्व रक्कम घेऊन लोणवाडी तांडा येथून वराडमार्गे वडली येथे जात असताना १२.४५ वाजता वडली शिवारातील शेषराव रामकृष्ण पाटील यांच्या शेताजवळ मागून दुचाकीवरुन आलेली तिघांनी समोर दुचाकी आडवी लावून मारहाण करुन दीड लाखाचा ऐवज लुटून नेला होता. सहायक फौजदार अतुल वंजारी, शरद भालेराव, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर व सचिन मुंडे यांचे पथक तयार केले होते. या पथकाने तिघांची माहिती काढली. त्यानंतर रविवारी सागर व विनोद या दोघांना अटक करण्यात आली.
अशी झाली होती लूट
दुचाकीवरील तिघांनी बारी यांना थांबवून एकाने दुचाकीची चावी काढली तर दुसºयाने कानशिलात लगावली. काही समजण्याच्या आत तिसºयाने पाठीला लावलेली बॅग काढली तेथून पोबारा केला. या बॅगेत १ लाख १४ हजार ८३० रुपये रोख, २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, १० हजार रुपये किमतीचे ग्राहकांना पावती देण्याचे मशीन, दीड हजार रुपये किमतीचे डोंगल असा १ लाख ४६ हजार ३३० रुपयांचा ऐवज लुटून नेला. 

Web Title:  Police officer recruited by both of them have looted the finance employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.