आजाराला कंटाळून पोलीस अधिका:याची आत्महत्या

By admin | Published: April 26, 2017 12:26 AM2017-04-26T00:26:09+5:302017-04-26T00:26:09+5:30

नंदुरबार शहरातील घटना : घरातच गळफास घेतला, कॅन्सरमुळे नैराश्य

The police officer, who is suffering from illness, suicides | आजाराला कंटाळून पोलीस अधिका:याची आत्महत्या

आजाराला कंटाळून पोलीस अधिका:याची आत्महत्या

Next

नंदुरबार : कॅन्सरच्या आजाराला कंटाळून पोलीस कर्मचा:याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी नंदुरबार शहरातील जुन्या पोलीस वसाहतीत घडली़ या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आह़े
   पोलीस मुख्यालयातील सहायक पोलीस निरीक्षक मंगलसिंग यादव खैरनार (49) यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होत़े यामुळे नैराश्यातून त्यांनी मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जुन्या पोलीस वसाहतीतील राहत्या घरी  गळफास घेतला. हा प्रकार खैरनार यांचा मुलगा अमोल याच्या लक्षात आल्यानंतर त्याने दोरी कापून           खैरनार यांना सामान्य रुग्णालयात दाखल केल़े उपचार घेत असतानाच दुपारी खैरनार यांचा मृत्यू झाला़
    अमोल  याच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े
  दोनच दिवसांपूर्वी कॅन्सरच्या आजाराला कंटाळून शिंदखेडा येथील डॉ़ श्याम गिरासे यांनी आत्महत्या केली होती़

Web Title: The police officer, who is suffering from illness, suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.