फैजपूर शहरात पोलिसांचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 12:37 AM2020-08-25T00:37:37+5:302020-08-25T00:37:48+5:30
फैजपूर शहरात सोमवारी सकाळी पथसंचलन करण्यात आले.
फैजपूर : कोरोना विषाणू माहामारीच्या पार्श्वभूमीवर साजरा होणाऱ्या गणेशोत्सव व मोहरममध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने फैजपूर पोलीस, शीघ्र कृती दल व होमगार्ड यांच्या वतीने सोमवारी सकाळी शहरात पथसंचलन करण्यात आले.
फैजपूर पोलीस ठाण्यापासून न्हावी दरवाजा ते सुभाष चौक, अंकलेश्वर बºहाणपूर महामार्ग छत्री चौक ते बसस्थानकाजवळील खंडोबा देवस्थान प्रवेशद्वार लेंडी मार्गे परत पोलीस ठाणे असे पथसंचलन करण्यात आले.
यावेळी पथसंचलनात आरएएफच्या १०० जवानांसह फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, आरएएफचे अधिकारी सारंग सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, गोपनीय पोलीस यशवंत टहाकळे, मोहन लोखंडे आरएएफचे जवान, फैजपूर पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी, होमगार्ड सहभागी झाले होते.