गस्तीवरील पोलिसांनी पकडले कत्तलीसाठी जाणाऱ्या गायींचे वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:12+5:302021-06-28T04:12:12+5:30
एरंडोल : येथे शनिवारी रात्री धरणगाव हायवे चौफुलीवर गस्त घालणारे पोलीस कर्मचारी विलास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी गतिरोधकावर कत्तलीसाठी ...
एरंडोल : येथे शनिवारी रात्री धरणगाव हायवे चौफुलीवर गस्त घालणारे पोलीस कर्मचारी विलास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी गतिरोधकावर कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या तीन गायी व एक वासरू घेऊन जाणारे वाहन पकडले.
पोलिसांना पाहताच वाहनचालकासह त्याचे दोन्ही साथीदार हे वाहन सोडून पलायन करण्यात यशस्वी झाले. या गायींची नजीकच्या गोशाळेत रवानगी करण्यात आली असून हा प्रकार शनिवारी भल्या पहाटे उघडकीस आला. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एमएच ४१ जी ९३५२ या क्रमांकाच्या वाहनात तीन गायी व एक वासरू कत्तलीसाठी नेण्याच्या उद्देशाने दाटीवाटीने कोंबून भरले होते. गायींसह एकूण १ लाख ३८ हजार रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, विलास पाटील, पंकज पाटील, संदीप सातपुते हे करीत आहेत.