पोलिसाने पाजले प}ीला फिनाईल

By admin | Published: January 25, 2017 12:56 AM2017-01-25T00:56:26+5:302017-01-25T00:56:26+5:30

खुनाचा प्रय} केल्याचा गुन्हा दाखल : तीन लाखासाठी कुटुंबाकडून विवाहितेचा छळ

Police phyllolite | पोलिसाने पाजले प}ीला फिनाईल

पोलिसाने पाजले प}ीला फिनाईल

Next

जळगाव : प्लॉट घेण्यासाठी तीन लाख रुपये आणण्यास नकार दिल्याने पोलिसाने प}ीला फिनाईल पाजून ठार मारण्याचा प्रय} केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पती रवींद्र श्रावण कापडणे (रा.शिव कॉलनी, जळगाव) याच्यासह त्याच्या कुटुंबातील पाच जणांवर सोमवारी रात्री रामानंद नगर पोलीस स्टेशनला खुनाचा प्रय} केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प}ी भाग्यश्री जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.
पोलीस शीघ्र कृती दलात
या प्रकरणातील रवींद्र हा पोलीस दलात कार्यरत असून पोलीस मुख्यालयात शिघ्र कृती दलात(क्युआरटी) त्याची डय़ुटी आहे. सांगवी, ता.पारोळा येथील भाग्यश्री व रवींद्र या दोघांचा विवाह 30 एप्रिल 2016 रोजी जळगाव शहरात झाला होता. विवाहाच्यावेळी पतीला 1 लाख रुपये रोख, साखरपुडय़ासाठी 50 हजाराचा व विवाहासाठी 50 हजाराचा खर्च माहेरच्या लोकांनी केला होता. माहेरच्या लोकांनी 3 रुपये शेकडा दराने व्याजाने 2 लाख रुपये सावकाराकडून कर्ज काढून मोठय़ा धूमधडाक्यात लगA केले होते. रवींद्रला लगAासाठी दहा हजार रुपयांचा सुट घेवून देण्यात आला होता, अशी माहिती भाग्यश्री यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दिली.
मोक्षदा पाटील यांनी दिली समज
भाग्यश्री हिला पती व सासरच्यांकडून त्रास वाढल्याने माहेरच्या लोकांनी पोलिसात तक्रार केली, मात्र तेव्हा दोघांना समजावण्यात आले. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याकडे हे प्रकरण गेले. त्यांनीही रवींद्रला समज दिली होती. त्यानंतर त्याने नमते घेतले होते, परंतु काही दिवसातच पुन्हा छळ सुरु झाला.
भावालाही रुग्णालयात मारहाण
भाग्यश्री हिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा रवींद्र व त्याच्यासोबत असलेल्या पाच ते सहा जणांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप भाग्यश्रीचा भाऊ ज्ञानेश्वर शिवाजी रामोशी (वय 25) याने केला आहे. यापूर्वीही त्याने शिव कॉलनीत मारहाण केली होती. या वादामुळे कुटुंबातील सदस्यही भितीमध्ये आहेत.
दरम्यान, पोलीस उपअधीक्षक                  सचिन सांगळे यांनीही रामानंद नगर पोलीस स्टेशनला भेट देवून घटनेची माहिती जाणून घेतली.
रात्री जबाब घेतल्यानंतर पतीसह सासु, सासरे, जेठ व नणंद या पाच जणांविरुध्द कलम 307 (जीवे ठार मारण्याचा प्रयत्न), 498 (अ) (हुंडय़ासाठी छळ करणे) , 323 (इजा होईल या उद्देशाने मारहाण करणे) ,504 ,506 (जीवे ठार मारण्याची धमकी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली. या प्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक सुजाता राजपूत या करीत आहे. त्यांनी या प्रकरणात प्राथमिक माहिती घेत जबाब नोंदविल्याचे सांगण्यात आले.
गेल्या दोन दिवसापासून पैसे व अन्य कारणावरुन भाग्यश्री व रवींद्र या दोघांमध्ये वाद सुरु होता. सोमवारी हा वाद                     टोकाला गेला. नणंद कविता वगळता पतीसह सर्वानी भाग्यश्रीला दुपारी दोन वाजता मारहाण केली. त्यात तिच्या हातातील बांगडय़ा फुटल्या. नंतर रवींद्रने एका बाटलीत आणलेले फिनाईल भाग्यश्रीच्या तोंडात जबरदस्तीने टाकले. या प्रकारानंतर घाबरलेल्या भाग्यश्रीने रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.
लगAानंतर पंधरा दिवसात त्रास़़़ लगA झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच पती रवींद्र कापडणे (पती),श्रावण शहादू कापडणे (सासरे), विमलबाई श्रावण कापडणे (सासु), हरीष श्रावण कापडणे (जेठ) सर्व रा.शिव कॉलनी, जळगाव व कविता सिध्दार्थ शिंदे (नणंद) रा.नेपानगर, मध्यप्रदेश या सर्वानी भाग्यश्रीकडे प्लॉट घेण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केली. लगAाच्या वेळी अशी कोणतीच बोलणी झालेली नसताना पैसे का द्यायचे तसेच लगAासाठीच माहेरच्यांनी व्याजाने पैसे काढले, त्यामुळे आता ही रक्कम देणे शक्य नसल्याचे भाग्यश्रीने सांगितले असता तिला त्रास द्यायला सुरुवात केली. यावेळी वेळोवेळी मारहाणही झाली.
पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयितांपैकी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. उपनिरीक्षक सुजाता राजपूत यांच्याकडे हा तपास सोपविण्यात आला आहे.लवकरच अटकेची प्रक्रिया केली जाईल.
-प्रवीण वाडिले, पोलीस निरीक्षक

Web Title: Police phyllolite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.