नद्या वाचविण्यासाठी पोलिसांनी घेतली प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:01 PM2017-09-25T23:01:22+5:302017-09-25T23:02:22+5:30

पंडित दिनयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पोलीस अधीक्षकांसह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी सोमवारी नद्या वाचविण्याची प्रतिज्ञा घेतली. प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी नद्या वाचविण्याचा संदेश किमान दहा लोकांपर्यंत पोहचवून जनजागृती करण्याचाही निर्णय घेण्यात आला. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

The police pledged to save the rivers | नद्या वाचविण्यासाठी पोलिसांनी घेतली प्रतिज्ञा

नद्या वाचविण्यासाठी पोलिसांनी घेतली प्रतिज्ञा

Next
ठळक मुद्देप्रत्येक कर्मचारी दहा लोकांचे प्रबोधन करणारनद्या वाचविण्याचा संदेश देणारनदी किनारी वृक्ष लागवड करा

आॅनलाईन लोकमत 
 जळगाव दि,२५:पंडित दिनयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पोलीस अधीक्षकांसह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी सोमवारी नद्या वाचविण्याची प्रतिज्ञा घेतली. प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांनी नद्या वाचविण्याचा संदेश किमान दहा लोकांपर्यंत पोहचवून जनजागृती करण्याचाही निर्णय घेण्यात आला. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालयात हा कार्यक्रम झाला.


प्रारंभी पंडित दिनयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. भारतीय लोक तंत्र आणि विचार,एकात्म मानववादाचा सिध्दांत याबाबत उपाध्याय यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. नद्यांच्या पुनर्जिवनासाठी नदी किनारी वृक्ष लागवड करणे व नदी अभियानाचा संदेश लोकांपर्यत पोहचविण्याचे आवाहन कराळे यांनी केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, उपअधीक्षक सचिन सांगळे, रशिद तडवी (गृह), कार्यालय अधीक्षक नागेश हडपे, पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, सहायक निरीक्षक सुभाष कावरे, उपनिरीक्षक कैलास खंबाट, ताठे यांच्यासह कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: The police pledged to save the rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.