पत्नीच्या हत्याप्रकरणी पोलीस पतीचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:16 AM2021-04-07T04:16:42+5:302021-04-07T04:16:42+5:30
जळगाव : चारित्र्याचा संशय घेवून तलाठी पत्नीचा खून करणा-या पोलीस पती नितीन मोतीराम पवार याचा जामीन अर्ज मंगळवारी न्यायाधीश ...
जळगाव : चारित्र्याचा संशय घेवून तलाठी पत्नीचा खून करणा-या पोलीस पती नितीन मोतीराम पवार याचा जामीन अर्ज मंगळवारी न्यायाधीश सी.व्ही.पाटील यांनी फेटाळून लावला आहे.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या नितीन पवार याने तलाठी या पदावर कार्यरत असलेल्या पत्नी अरूणा पवार यांच्यावर चारित्र्याचा संशय घेवून डोक्यात काही तरी मारून खून केल्याची घटना २९ नाव्हेंबर २०२० रोजी घडली होती. याप्रकरणी मिराबाई परशुराम ठाकरे यांच्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात नितीन याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, त्याने जिल्हा न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर मंगळवारी कामकाज होवून न्यायाधीश सी.व्ही.पाटील यांनी तो जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. याप्रकरणी सरकार पक्षाकडून ॲड. रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले.