पोलीस उपअधीक्षकांनी घेतली 11 गुन्हेगारांची ओळख परेड

By admin | Published: June 24, 2017 05:06 PM2017-06-24T17:06:46+5:302017-06-24T17:50:52+5:30

संशयास्पद स्थितीत आढळल्यास कारवाईचा दिला इशारा

Police sub-inspectors took 11 identities of criminals on parade | पोलीस उपअधीक्षकांनी घेतली 11 गुन्हेगारांची ओळख परेड

पोलीस उपअधीक्षकांनी घेतली 11 गुन्हेगारांची ओळख परेड

Next

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.24 - पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला गुन्हेगार कुठेही संशयास्पदरीत्या आढळून आला तर त्याच्यावर त्याच वेळी तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी शनिवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये घेतलेल्या बैठकी दरम्यान प्रभारी अधिकारी व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचा:यांना दिल्या. 
या बैठकीत सांगळे यांनी 11 गुन्हेगाराचे पूर्वीचे रेकॉर्ड, गुन्हे करण्याच्या पध्दती, सद्यस्थितीत त्यांच्या हालचाली, त्यांचे नातेवाईक, साथीदार, वकील, जामीनदार याची सविस्तर माहिती जाणून घेतली. 
अनेक गुन्हेगार एका ठाण्याच्या हद्दीत राहून दुस:या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करत असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर विभागातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हेही दाखल आहेत. त्यामुळे सर्व पोलीस ठाण्यांबाबत गुन्हेगारांची त्यांच्या कार्यपध्दती व तसेच गुन्ह्यांच्या माहितीचे आदानप्रदान करण्याच्या सूचना सांगळे यांनी या बैठकीत केल्या. 
यावेळी पोलीस निरीक्षक बी.जी.रोहम, तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक रत्नपारखी, शहरचे प्रदीप ठाकूर, शनी पेठचे प्रवीण वाडिले, जिल्हा पेठचे सुनील गायकवाड, एमआयडीसीचे सुनील कुराडे उपस्थित होते. 

Web Title: Police sub-inspectors took 11 identities of criminals on parade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.