जळगावातील संवेदनशील भागात पोलिसांचे पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 10:37 PM2018-07-29T22:37:59+5:302018-07-29T22:39:32+5:30

Police track in sensitive areas of Jalgaon | जळगावातील संवेदनशील भागात पोलिसांचे पथसंचलन

जळगावातील संवेदनशील भागात पोलिसांचे पथसंचलन

Next
ठळक मुद्देगाड्यांचा ताफा व शस्त्रधारी कर्मचाऱ्यांनी वेधले लक्षजळगाव शहरातील १४६ केंद्र संवेदनशीलपथसंचलनात ४०० कर्मचा-यांचा ताफा

जळगाव : महापालिकेसाठी १ आॅगस्ट रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया निर्भयपणे पार पडावी व कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये यासाठी पोलीस दलातर्फे रविवारी शहरातील संवेदनशील भागात पोलिसांचे पथसंचलन राबविण्यात आले. शस्त्रधारी पोलीस व गाड्यांचा ताफ्याने शहरवासियांचे लक्ष वेधले होते. शहरातील पाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३५ इमारतीत १४६ केंद्र संवेदनशील आहेत.त्या भागावर पोलिसांनी अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.
सकाळी अकरा वाजता पोलीस मुख्यालयापासून पोलिसांचा ताफा निघाला. कोर्ट चौक, भिलपुरा, असोदा रेल्वे गेट, रथ चौक, नेरी नाका, अजिंठा चौक, काशिनाथ चौक, संतोषी माता चौक, मेहरुण, तांबापुरा, इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक, मानराज पार्क, पिंप्राळा, पिंप्राळा हुडको, गुजराल पेट्रोल पंप, हायवे दर्शन कॉलनी, सुरत रेल्वे गेट, गेंदालाल मील, शिवाजी नगर या भागात पथसंचलन केल्यानंतर दुपारी पोलिसांचा ताफा पुन्हा मुख्यालयात आला.
पथसंचलनात अहमदनगर येथील ७५,नाशिक ग्रामीणचे १००, नंदुरबारचे ५०, धुळे येथील ७५ व एसआरपी प्लाटूनमधील ९० कर्मचारी सहभागी झाले.

Web Title: Police track in sensitive areas of Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.