पोलीस बदल्यांचा उगले पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 04:58 PM2019-06-08T16:58:29+5:302019-06-08T17:10:59+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी गेल्या आठवड्यात शिपाई ते सहायक फौजदार पदाच्या बदल्यांचे गॅझेट प्रसिध्द केले. उगले यांनी प्रत्येक पोलिसांना त्यांच्या मनाप्रमाणे बदल्यांचे ठिकाण दिले आहे. स्थगिती आवश्यक असले तर ती देण्याचा प्रयत्न केला तसेच शक्य नसेल कर्मचारी सध्या ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत असेल त्याला लागूनच असलेल्या पोलीस ठाण्यात बदली दिलेली आहे.
सुनील पाटील
जळगाव : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी गेल्या आठवड्यात शिपाई ते सहायक फौजदार पदाच्या बदल्यांचे गॅझेट प्रसिध्द केले. उगले यांनी प्रत्येक पोलिसांना त्यांच्या मनाप्रमाणे बदल्यांचे ठिकाण दिले आहे. स्थगिती आवश्यक असले तर ती देण्याचा प्रयत्न केला तसेच शक्य नसेल कर्मचारी सध्या ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत असेल त्याला लागूनच असलेल्या पोलीस ठाण्यात बदली दिलेली आहे. त्याशिवाय निवृत्तीला काही दिवस बाकी असलेले किंवा मुलांचे शिक्षण, आजारपण याचा विचार करुन प्रत्येकाची विनंती मान्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अपेक्षेप्रमाणे स्थानिक गुन्हे १९ नव्या कर्मचा-यांची एन्ट्री झाली आहे. यात साहजिकच राजकीय दरबारातून आलेल्या यादीचा विचार झालेला आहे, तर मोजक्याच जणांना कर्तुत्वाच्या बळावर नियुक्ती मिळाली आह, असो काहीही असले तरी अपवाद वगळता कर्मचाºयांनी बदल्यांमध्ये मनापासून समाधान मानले आहे, त्याचा परिणाम कर्मचाºयांच्या कुटुंबात दिसून आला. कर्मचाºयांप्रमाणे कुुटुंबातही आनंदाची लहर आहे.
एकूण ४८४ कर्मचारी बदलीपात्र होते त्यापैकी २४५ जणांना मुदतवाढ व विनंती मान्य करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीत १६ कर्मचारी बदलीपात्र होते,त्यापैकी ११ जणांच्या बदल्या झालेल्या आहेत.
आता अधिका-यांच्या बदल्या होणार आहेत, त्यातही जास्त राजकीय हस्तक्षेप होऊ शकतो. अनेक प्रभारी अधिका-यांची कामगिरी असमाधानकारक आहे, त्यांच्या कामगिरीमुळे पोलीस ठाण्यात गट पडले आहेत. काही अधिकाºयांनी तर नडणा-या सहकारी अधिकारी व कर्मचा-यांचा वचपा काढण्याचा विडाच उचलला आहे. त्यांनी थेट रेकॉर्ड खराब करण्याचेही बोलून दाखविले आहे, त्यामुळे भविष्यात चांगल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या नोक-यांवर गंडातर येण्याआधी अशा प्रभारी अधिका-यांनाच बदलविणे योग्य ठरणार आहे. पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागून आहे. कर्मचा-यांच्या बदल्या मनाप्रमाणे झाल्याने त्याला उगले पॅटर्न असे संबोधण्यात येत आहे.