पोलिसावरील हल्ल्याची चौकशी

By admin | Published: February 9, 2017 12:17 AM2017-02-09T00:17:47+5:302017-02-09T00:17:47+5:30

पोलीस महानिरीक्षक : तपास कॉन्स्टेबलकडून नाही अधिका:याने करावा

Policeman Attack Investigation | पोलिसावरील हल्ल्याची चौकशी

पोलिसावरील हल्ल्याची चौकशी

Next



जळगाव : पोलिसांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत.अशा प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर दोषीवर कडक करवाई व्हावी यासाठी त्या गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिका:यांनीच करावा याबाबतचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी दिले असून याप्रकाराच्या सखोल चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत. याबाबत आपण परिपत्रकच काढल्याचे चौबे यांनी पत्रकारांना सांगितले.
पोलिसांवरील हल्ल्यामुळे कर्मचा:यांचे मनोबल खचते. वरिष्ठ अधिका:यांनी अशा वेळी कर्मचा:यांच्या पाठीशी राहणे अपेक्षित आहे. काही घटनांमध्ये तक्रार दाखल करु नये यासाठी आपलेच कर्मचारी व अधिकारी दबाव आणतात, त्यामुळे हल्लेखोरांची हिंमत वाढते,तर दुसरीकडे अशा प्रकारामुळे पोलिसांचे खच्चीकरण होते. दोन दिवसापूर्वी आकाशवाणी चौकात वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून शिवीगाळ झाल्याच्या घटनेवर ते बोलत होते.
या प्रकरणातही शिवीगाळ करणारा धरणगाव येथील कार चालक तसेच पोलीस दलाच्या सायबर कक्षाचे काम करणा:या तरुणावर कारवाई करु नये यासाठी पोलीस दलातीलच काही अधिकारी व कर्मचा:यांनी पुढाकार घेतल्याचे समोर आल्यानंतर चौबे यांनी या प्रकरणाची चौकशी करुन दोषींविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांना दिले आहेत.
पोलिसांवरील हल्ल्याच्या गुन्ह्याचा तपास कर्मचा:यांनी केला तर त्यात हस्तक्षेप होण्याची भीती असते, त्यामुळे कर्मचा:यांना न्याय मिळत नाही. अशा प्रकरणात प्रभारी अधिका:यानेच तो तपास करावा, जेणे करुन दोषी व्यक्तीला शिक्षा होवू शकते. पोलिसांशी वाद असो की हल्ला करणारी व्यक्ती कोणीही असली तरी त्याच्यावर कठारे कारवाई केली जाईल, असे चौबे यांनी स्पष्ट केले.

प्रल्हाद बोरसे यांच्या प्रकरणाची चौकशी
वाहतूक शाखेचे हेडकॉन्स्टेबल प्रल्हाद बोरसे यांच्यावरही काही दिवसापूर्वी स्टेडीयम चौकात एका तरुणाने हल्ला करुन गणवेश फाडला होता. याप्रकरणी बोरसे यांनी संबंधित तरुणाविरुध्द जिल्हा पेठला तक्रार दिली होती. ही तक्रार देवू नये यासाठी पोलीस दलातीच काही जणांनी बोरसे यांच्यावर दबाव आणला होता, मात्र त्यांनी त्यांना न जुमानता तक्रार दिली. संबंधित व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला म्हणून बोरसे यांची वाहतूक शाखेतून उचलबांगडी करुन मुख्यालयात बदली करण्यात आली होती. चौबे यांनी या प्रकरणाचीही चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांवर हल्ले होत असतील व त्यात पोलीसच दबाव आणत असतील तर संबंधितावर कारवाई केली जाईल. वाहतूक शाखेच्या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
-विनयकुमार चौबे, विशेष पोलीस महानिरीक्षक
 

Web Title: Policeman Attack Investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.