जळगावात रिक्षाचालकाने पकडली पोलिसाची कॉलर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 11:35 AM2017-09-09T11:35:56+5:302017-09-09T11:36:37+5:30
ताब्यात घेतल्यावर फोडले डोके : तालुका पोलिसात गुन्हा दाखल
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 9 - शहर वाहतूक शाखा व क्यूआरटी पथक यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय महामार्गावर कारवाईची मोहिम राबविण्यात येत आह़े बांभोरी नाक्यावर कारवाई दरम्यान पाळधी येथील रिक्षाचालकाने क्यूआरटी पथकातील पोलीस कर्मचा:याची कॉलर पकडून गोंधळ घालत शासकीय वाहनावर डोके आपटून घेतल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली़
क्यूआरटी पथक व वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी कारवाईची मोहिम राबविण्यात आली़ रिक्षाच्या (क्र.एम.एच.19-बी.जे. 4722) फ्रंट सीटवर पाळधी येथील रिक्षाचालक दिनेश विजय भोसले (वय-45) यांनी प्रवाशांना बसविल्याने त्यास पथकाने शिवकॉलनीनजीक मेमो दिला.
पोलिसांनी सांगितले की, रिक्षाचालक दिनेश भोसले यास पथकाने गुन्हा दाखल करण्यासाठी ताब्यात घेत शासकीय वाहनात बसविण्याचा प्रयत्न केला़ यादरम्यान त्याने विरोध करत कारवाईच्या भितीने क्यूआरटी पथकाच्या वाहनावर डोके आपटून स्वत:ला जखमी करुन घेतल़े यानंतर सर्व कर्मचा:यांनी त्याला तालुका पोलीस ठाण्यात आणल़े
शिवकॉलनी स्टॉप कारवाईनंतर पथक बांभोरी नाक्यावर वाहनांच्या तपासणीसाठी थांबल़े पथकाच्या पाठोपाठ रिक्षाचालक दिनेश भोसले हाही रिक्षा घेवून आला़ पथक इतर वाहनांची तपासणी करत असताना भोसले याने नागरिकांना मेमो फाडू नका, असे म्हणत गोंधळ घातला़ पोलिसांनी त्याची समजूत घातली असता त्याने क्यूआरटी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रभूसिंग अप्परसिंग जगरवाल या कर्मचा:याची कॉलर पकडली़