पोलिसाने लाथ मारुन फोडली डॉक्टरांच्या वाहनाची काच
By admin | Published: May 3, 2017 04:05 PM2017-05-03T16:05:22+5:302017-05-03T16:05:22+5:30
कुसुंब्याजवळ भररस्त्यावर दादागिरी. डॉक्टरच्या हाताला दुखापत
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.3- गतिरोधकावर कारची गती कमी केल्याने मागून आलेल्या पोलिसाच्या दुचाकीला कट लागल्यामुळे पोलिसाने लाथ मारुन डॉक्टरच्या कारची काच फोडली तसेच कॉलर धरुन बाहेर ओढण्याचा प्रय} केला. या झटापटीत डॉक्टरच्या हाताला दुखापत झाली. ही घटना बुधवारी सकाळी आठ वाजता कुसुंबा गावाजवळ गतिरोधकावर घडली. दादागिरी करणारा पोलीस हा नंदूरबार येथे वायरलेस कक्षात कार्यरत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ.उदय पाटील हे बुधवारी कारने (क्र.एम.एच.19 ए.ई.5100) जामनेर व तेथून बोदवडला जाणार होते. कुसुंबा गावाजवळ सकाळी आठ वाजता गतिरोधकावर त्यांनी कारची गती कमी केली. त्याचवेळी मागून आलेल्या पोलिसाच्या दुचाकीला कारचा कट लागला. माझी चूक नाही असे डॉक्टर सांगत असताना संतापलेल्या पोलिसाने हाथाचा बुक्का व लाथ मारुन चालकाच्या दिशेचा कारचा काच फोडला.