‘कायद्याचं बोला...’ म्हणत पोलीसदादाची १ लाख वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:38 AM2021-01-13T04:38:52+5:302021-01-13T04:38:52+5:30

जळगाव : वाहतूक नियमांना खो देणाऱ्या १ लाख वाहनांवर पोलिसांनी वर्षभरात कारवाई केली असून या वाहनधारकांकडून दंडाच्या माध्यमातून सरकारच्या ...

Policeman's action on 1 lakh vehicles saying 'Speak the law ...' | ‘कायद्याचं बोला...’ म्हणत पोलीसदादाची १ लाख वाहनांवर कारवाई

‘कायद्याचं बोला...’ म्हणत पोलीसदादाची १ लाख वाहनांवर कारवाई

Next

जळगाव : वाहतूक नियमांना खो देणाऱ्या १ लाख वाहनांवर पोलिसांनी वर्षभरात कारवाई केली असून या वाहनधारकांकडून दंडाच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत दोन कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. त्याशिवाय मद्याची झिंग चढवून वाहने हाकणाऱ्या ९९ मद्यपींवर ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्वाात मार्च ते ऑगस्ट कडक लॉकडाऊन असतानाही पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवून नियम मोडणाऱ्यांविरुध्द कायद्याचा दंडूका उगारला आहे.

जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत विविध पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून १९ हजार ९०२ वाहनांवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर कारवाई झाली असून अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या २८१ असे एकूण ३५ पोलीस ठाण्यांमार्फत २० हजार १८३ वाहनांवर कारवाई झाली आहे. त्यांच्याकडून ४२ लाख ३५ हजार ४९८ रुपयांचा दंड वसूल झाला आहे. एकट्या नोव्हेंबर महिन्यात १३,८४५ वाहनांवर कारवाई झाली असून त्यांच्याकडून एकूण २९ लाख १२ हजार ३९८ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या २७० वाहनांचा त्यात समावेश आहे. २०१९ मध्ये ७४ हजार ८४७ वाहनांवर कारवाई होऊन त्यांच्याकडून १ कोटी ३३ लाख २९ हजार ११३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. त्यातुलनेत यंदा कारवाई व दंडाची रक्कम मोठी आहे.

या प्रकारची केली कारवाई

वाहनधारकाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसणे, कागदपत्रे न बाळगणे, पीयुसी, फिटनेस, विमा यासह वेगाने वाहन चालविणे, दुचाकीवर तीन सीट, चारचाकी वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बसविणे, मालवाहू वाहनातून प्रवाशी वाहतूक करणे आदी प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.

असे आहे कारवाईचे स्वरुप

शाखा अवैध इतर एकूण वाहने दंड

सर्व पोलीस ठाणे २८१ १९९०२ २०१८३ ४२,३५,४९८

शवाशा जळगाव ३३० ३७८७५ ३८२०५ १,१८,९०,३५०

शवाशा चाळीसगाव २६ १९५४४ २१९१२ ३४११००

शवाशा भुसावळ ३९ १९५४४ १९५८३ ३०८९६००

एकूण ६७६ ९९२०७ ९९८८३ १,९५,५६,५४८

Web Title: Policeman's action on 1 lakh vehicles saying 'Speak the law ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.