पोलीस पाटीलकृत दडलेल्या मातृत्वाने दीन दुबळ्या कुडकुडत्या बालकांना दिली उबदार कपड्यांची उब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 03:14 PM2019-01-27T15:14:22+5:302019-01-27T15:16:12+5:30
घराकडून शेतात जाताना रस्त्यातच असलेल्या आदिवासी भिल्ल वस्तीतील चिमुरडी बालकांना किमान २.२७ सेल्सिअंशपर्यंत तापमानाचा गोठलेल्या पाऱ्यातील थंडीत कुडकुडताना पाहून, माया, ममता व वात्सल्याचा असलेला पाझर फुटल्याने केºहाळे बुद्रूक येथील पोलीस पाटील वर्षा प्रवीण पाटील यांनी त्या दोन-तीन बालकांना घरातील जुनी स्वेटर व कपडे देऊ केले. मात्र त्यांच्या चेहºयावरील तरळणारा आनंद पाहून झालेले मनस्वी समाधान पाहता, त्यांनी वाड्या-पाड्यातील गृहिणींशी हितगुज साधून त्यांच्याकडून जुनी स्वेटर व वापरते कपडे भिल्ल- वस्तीतील आबालवृद्ध महिला-पुरुष व बालकांना स्वेटर व जुने वापरते कपडे वितरित करून पोलिस पाटीलकीच्या पालकत्वातील दातृत्वाने मातृत्वाचा आनंद लाभला आहे.
रावेर, जि.जळगाव : घराकडून शेतात जाताना रस्त्यातच असलेल्या आदिवासी भिल्ल वस्तीतील चिमुरडी बालकांना किमान २.२७ सेल्सिअंशपर्यंत तापमानाचा गोठलेल्या पाऱ्यातील थंडीत कुडकुडताना पाहून, माया, ममता व वात्सल्याचा असलेला पाझर फुटल्याने केºहाळे बुद्रूक येथील पोलीस पाटील वर्षा प्रवीण पाटील यांनी त्या दोन-तीन बालकांना घरातील जुनी स्वेटर व कपडे देऊ केले. मात्र त्यांच्या चेहºयावरील तरळणारा आनंद पाहून झालेले मनस्वी समाधान पाहता, त्यांनी वाड्या-पाड्यातील गृहिणींशी हितगुज साधून त्यांच्याकडून जुनी स्वेटर व वापरते कपडे भिल्ल- वस्तीतील आबालवृद्ध महिला-पुरुष व बालकांना स्वेटर व जुने वापरते कपडे वितरित करून पोलिस पाटीलकीच्या पालकत्वातील दातृत्वाने मातृत्वाचा आनंद लाभला आहे.
रावेर तालुक्यातील केºहाळा बुद्रूक येथील पोलीस पाटील वर्षा प्रवीण पाटील या महिला मजुरांना घेऊन घरच्या शेतात जात असताना त्यांना कडाक्याच्या २.२८ सेल्सिअंशवर गोठलेल्या पाºयातील थंडीत उघडी नागडी कुडकुडत्या चिमुरड्यांची अवकळा पाहून त्यांची माणुसकीतील सहृदयता अखेर ओशाळली. त्यांनी शेतातून घरी परतल्यानंतर घरात ठेवलेली जुनी वापरातील ऊबदार स्वेटर, शाल, ब्लँकेट, शर्ट, पॅन्ट, लहान मुलींचे फ्रॉक दोन तीन कुटुंबात वाटली. त्या कुटुंबातील लहान बालकांना रात्री त्या उबदार कपड्यांमधून मिळालेला दिलासा पुन्हा दुसºया दिवशी त्यांच्या चेहºयावर तरळणाºया आनंदातून ओसंडून वाहत होता.
गावच्या पोलीस पाटीलकीतील पालकत्वात दडलेले ममत्व व दातृत्वाला त्या चिमुरड्यांच्या आनंद व हर्षोल्हासातून वर्षा पाटील यांना एक उत्स्फूर्तपणे ऊर्जा मिळाली. त्यांनी गावात घराघरातून अशी थंडीची जुनी व वापरती उबदार स्वेटर, कानटोपी, कांबळ, ब्लँकेट, शर्ट, पॅन्ट, साड्या व फ्रॉक्स जमा करण्यासाठी आर्त हाक देण्यासाठी आॅडियो रेकॉर्डींग केलेले मेमरी कार्ड ग्रामपंचायतच्या घंटागाडीवर लावून आधुनिक पध्दतीने दवंडी पिटवली. त्याला समृध्दीने नटलेल्या केºहाळे गाववासीयांनी तेवढ्याच सहृदयतेने प्रतिसाद दिला.
वर्षा पाटील यांच्या वाड्यातील व गावातील तरुण मित्र मंडळ, दुर्गोत्सव मंडळ व गणेशोत्सव मंडळातील विशाल कुंभार, धीरज महाजन, यश महाजन, नीलेश सुतार, प्रफुल्ल सुतार, सुमित गायकवाड, भूषण महाजन, दीपक महाजन, राहुल महाजन, सौरव महाजन, अक्षय महाजन, शुभम महाजन, अनंत महाजन, किरण कुंभार, जयेश कुंभार, वैभव महाजन, देवाशिष महाजन आदींनी पोलीस पाटील वर्षा प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली १० कापूस वाहतुकीचे गोणे भरून उबदार थंडीचे स्वेटर, कानटोपी, कांबळ, ब्लँकेट, शर्ट, पॅन्ट, साड्या व फ्रॉक्स गोळा केले.
मंगरूळ रस्त्यावरील भिल्ल-कोतील वाड्यातील सुमारे ५८ ते ६० कुटुंबातील लहान बालकांसह आबालवृद्ध महिला-पुरुषांना त्यांनी कडाक्याच्या थंडीत उबदार कपडे वितरित करून मायेची उब दिल्याने त्यांच्या पोलीस पाटीलकीच्या पालकत्वात दडलेल्या दातृत्व व मातृत्वाला गोरगरीब उघड्या बालकांनी सलाम केला.