उद्दिष्टापेक्षा अधिक ११ हजार बालकांना पोलिओ डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:18 AM2021-02-11T04:18:14+5:302021-02-11T04:18:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात ३१ जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत उद्दिष्टापेक्षा ...

Polio dose to 11,000 children above target | उद्दिष्टापेक्षा अधिक ११ हजार बालकांना पोलिओ डोस

उद्दिष्टापेक्षा अधिक ११ हजार बालकांना पोलिओ डोस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात ३१ जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत उद्दिष्टापेक्षा अधिक बालकांना डोस देण्यात आरेाग्य यंत्रणेला यश आले आहे. जिल्ह्यात १०३ टक्के लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. यात ४ लाख ४४ हजार १७९ बालकांना हे डोस पाजण्यात आले आहेत.

जिल्ह्यात विविध ७ हजारांच्या आसपास केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात आली होती. यात ३१ जानेवारीला ९८ टक्के बालकांना डोस पाजण्यात आले होते. त्यानंतर घरोघरी जाऊन ही मोहीम राबविण्यात आली होती. त्यात अपेक्षित लाभार्थी ४ लाख ३३ लाख ७४ होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी ही माहिती दिली.

असे झाले लसीकरण

ग्रामीण : अपेक्षित लाभार्थी २७४५०६, प्रत्यक्ष लसीकरण : २८३६३३

शहरी : अपेक्षित लाभार्थी ९७६५८, प्रत्यक्ष लसीकरण १०३६३९

एकूण मनपा वगळून : अपेक्षित लाभार्थी ३७२१६४, प्रत्यक्ष लसीकरण ३८७२७२

मनपा : अपेक्षित लाभार्थी ६०९१०, प्रत्यक्ष लसीकरण ५६९०७

Web Title: Polio dose to 11,000 children above target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.