जळगावात 37 हजार 924 बालकांना पोलिओ डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:53 PM2018-01-28T23:53:02+5:302018-01-28T23:53:07+5:30
191 बुथ
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 28- पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवार, 28 रोजी 37 हजार 924 बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. र्वरित बालकांना घरोघरी जाऊन डोस दिले जाणार आहे.
0 ते 5 वर्षे वयोगटातील 68 हजार 824 पोलिओ लसीकरणाचे लाभार्थी असून यापैकी रविवारी 37 हजार 924 बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. सकाळी छत्रपती शाहू महाराज रूग्णालय येथे महापौर ललित कोल्हे यांच्याहस्ते पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ झाला.
या मोहिमेसाठी जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत 191 बुथ लावण्यात आले होते. तसेच 45 ट्रांङिाट टीम्स, 5 मोबाईल टीम्स, 1 नाईट टीम असे एकूण 670 कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
आजपासून घरोघरी जाऊन देणार डोस
काही कारणाने रविवारी डोसपासून वंचित राहिलेल्या बालकांना 29 जानेवारीपासून पाच दिवस घरोघरी जाऊन पोलिओचा डोस पाजण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.