राजकीय चर्चांचा रोजचा ‘बस’ प्रवास : अच्छे दिन आहेत कुठे...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 01:11 PM2019-04-02T13:11:37+5:302019-04-02T13:12:09+5:30

जळगाव ते पाचोरा 50 किमी

Political discussions on daily bus bus: Where are the good days ...? | राजकीय चर्चांचा रोजचा ‘बस’ प्रवास : अच्छे दिन आहेत कुठे...?

राजकीय चर्चांचा रोजचा ‘बस’ प्रवास : अच्छे दिन आहेत कुठे...?

googlenewsNext

सचिन देव
जळगाव : नागरिकांनी अच्छे दिन येणार, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार, गावाचा विकास करणार, अशा विविध घोषणा करणाऱ्या सरकारला निवडून दिले. मात्र, पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला नाही. दुसरीकडे व्यापारीदेखील शेतकºयांकडुन कवडीमोल भावात माल खरेदीकरुन, शेतकºयांची फसवणुक करित आहे. त्यामुळे अच्छे दिन कुठे आहेत, हे दाखवावे, असे मत पाचोरा विधानसभा मतदार संघातील मतदारांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. लोक सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने जळगाव लोकसभा मतदार संघातील पाचोरा विधानसभा मतदार संघातील मतदारांशी जळगाव-पाचोरा एसटीबसमध्ये संवाद साधला.
पिंपळगाव हरेश्वर येथील शेतकरी प्रदीप बडगुजर यांनी सांगितले की, शेतकºयांच्या मालाला खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असा प्रकार शेतीत सुरु आहे. गावात ८ दिवसानंतर पाणी पुरवठा होतोय. पाच वर्षांत प्रशासनाने पाण्याचे कुठलेही नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आमदार-खासदार लग्न समारंभाच्या वेळेस येतात. गावाच्या समस्यांबद्दल काहीही बोलत नाही. राणीचे बांबरुड येथील बाळकृष्ण पाटील म्हणाले की, आमच्या गावात रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे.
स्थानिक मुद्याला महत्व
या पाच वर्षांत शेतकरी बांधवांना कुठलेही अच्छे दिन आले नसून, अच्छे दिन व्यापाºयांना आले आहेत. त्यामुळे हे सरकार शेतकºयांचे नसून, व्यापाºयांचे आहे. या निवडणुकीत आम्ही स्थानिक मुद्यालाच महत्व देणार असल्याचे सांगितले.
खेडगांव नंदीचे येथील सत्यवान पाटील यांनी फेब्रुवारीअखेर शेतकºयांच्या खात्यात २ हजार जमा करणार होते.मात्र, एप्रिल सुरु होऊनही पैसे जमा झाले नाही. हे सरकार फक्त घोषणाबाज असल्याचे सांगितले.

Web Title: Political discussions on daily bus bus: Where are the good days ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव