जळगावात सीबीआयकडून चौकशी झालेल्यांवर राजकीय वरदहस्त
By admin | Published: March 28, 2017 11:57 AM2017-03-28T11:57:38+5:302017-03-28T11:57:38+5:30
जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेतून नोटा बदली केल्याप्रकरणी सीबीआय चौकशी झालेल्या व्यक्तींवर राजकीय वरदहस्त आहे.
Next
दोषारोपांमध्ये कुणाची असणार नावे : नंदकुमार वाणी, ओम जांगीड व अनिल नारखेडे यांची 29 रोजी मुंबईत चौकशी
जळगाव, दि.28- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चोपडा शाखेतून 73 लाख 32 हजारांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा बदली केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) चौकशी झालेल्या व्यक्तींवर राजकीय वरदहस्त असून, या वरदहस्ताच्या बळाने ते मोठय़ा पदांर्पयत पोहोचले आहेत.
राजकीय वतरुळात चौकशी झालेल्या व्यक्तींचा संबंध बडय़ा राजकीय व्यक्तींसोबत असल्याची कुजबूतही होती. तर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी चौकशी झालेल्या व्यक्ती राजकीय बळामुळेच वर्ग चारवरून वर्ग 1 च्या पदांर्पयत पोहोचल्याचा आरोप या प्रकरणात प्रतिक्रिया देताना केला होता.
नोटाबदली प्रकरणात गुन्हा दाखल असलेले जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांची राजकीय मंडळीशी सलगी आहे. यामुळेच की काय या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही त्यांची ना बदली झाली ना पदावरून चौकशी पूर्ण होईर्पयत दूर करण्यात आले. त्यांचे शिक्षण अभियांत्रिकी विषयातील पदवीचे आहे, असे असताना ते जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक बनले.
वाणी, सूर्यवंशी, तायडे यांची सत्तेतील बडय़ा व्यक्तीशी जवळीक
या प्रकरणात चौकशी झालेले जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी, जि.प.तील कक्ष अधिकारी सुनील सूर्यवंशी व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक भूषण तायडे यांचीही सत्तेतील एका बडय़ा व्यक्तीशी जवळीक आहे. नंदकुमार वाणी हे जि.प.मध्ये वर्ग 4 चे कर्मचारी होते, ते बढत्या घेत जि.प.मध्ये प्रमुख मानल्या जाणा:या सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदार्पयत कसे पोहोचले, यांची चौकशी करावी, असा आरोप मध्यंतरी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी करून खळबळ उडविली होती. अर्थातच वाणी यांची सत्ताधारी पक्षातील बडय़ा व्यक्तीसोबतची जवळीक लपून राहिलेली नाही. याच व्यक्तीच्या बळामुळे वाणी जि.प.मध्ये प्रमुख पदांवर नियुक्त होऊ शकले, अशी कुजबूज सुरू आहे. सुनील सूर्यवंशी हेदेखील सत्ताधारी पक्षातील एका व्यक्तीच्या गोटातील आहे. यामुळेच की काय त्यांची बाल कल्याण विभागातून सामान्य प्रशासन विभागात नंदकुमार वाणी यांना मदत व्हावी यासाठी कक्ष अधिकारीपदी नियुक्ती झाली होती. सूर्यवंशीदेखील औषध निर्माता या पदावर जि.प.मध्ये रूजू झाले होते. नंतर सूर्यवंशी हे मुख्यालयात आले. मुख्यालयातून बाहेर फारसा काळ सूर्यवंशी कार्यरत नव्हते. या सलगीवरून सूर्यवंशी यांच्यावर जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीत (ग.स.) टिकादेखील केली जायची. याच एका नेत्याच्या मदतीने ग.स. निवडणुकीच्या मनाजोग्या तारखा जाहीर झाल्या होत्या.