Corona Vaccination: कोरोना लसीसाठी 'राजकीय' वशिलेबाजी; नेरीत दोन गटांत राडा, लसीकरण बंद पाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 11:56 AM2021-05-08T11:56:49+5:302021-05-08T11:57:53+5:30
Corona Vaccination in Jalgaon: शनिवारी सकाळी १८ वर्षापुढील युवकांचे लसीकरण सुरु झाल्याने येथे एकच गर्दी झाली. गावातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने जळगावमधील आपल्या संपर्कातील काही लोकांजवळून पैसे घेवून त्यांना याठिकाणी लस उपलब्ध करून दिली.
जामनेर : स्थानिक नागरिकांना सोडून बाहेरगावच्या लोकांना लस दिली जात असल्याचा आरोप करत राजकीय कार्यकर्त्यांनी आरोग्य केंद्रात राडा घातला. यात काही काळ लसीकरण बंद पाडले. नेरी ता.जामनेर येथील आरोग्य केंद्रात शनिवारी सकाळी १०.३० वाजता हा प्रकार घडला.
शनिवारी सकाळी १८ वर्षापुढील युवकांचे लसीकरण सुरु झाल्याने येथे एकच गर्दी झाली. गावातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने जळगावमधील आपल्या संपर्कातील काही लोकांजवळून पैसे घेवून त्यांना याठिकाणी लस उपलब्ध करून दिली. असा आरोप येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्ते समोरासमोर उभे ठाकले. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला यामुळे लसीकरण बंद होवून पोलिसांना याठिकाणी पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी मध्यस्थी करीत वादा मिटवला.