राज्यातील ३१२ ग्रामपंचायतीसाठी आता २७ रोजी मतदान, सुधारीत कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:05 PM2018-02-10T13:05:34+5:302018-02-10T13:07:48+5:30
अर्ज सादर करण्याची वेळही वाढवली
जिजाबराव वाघ / आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. १० - मार्च ते मे २०१८ मध्ये मुदत संपणा-या राज्यातील ३१२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला असून सर्व कार्यक्रम दोन दिवसांनी पुढे ढकलला गेला आहे. ग्रा.पं.साठी पूर्वी जाहीर केलेल्या २५ ऐवजी २७ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निकालही २६ ऐवजी २८ रोजी जाहीर केले जातील. ९ रोजी राज्य निवडणूक आयोग सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक होणाºया ५८ तर पोटनिवडणूक होणा-या १३२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
राज्यातील नाशिक विभाग ७५, कोकण ३९, पुणे १३१, औरंगाबाद ३५, अमरावती १०, नागपूर २२ अशा ३१२ ग्रामपंचायतीची मुदत मार्च ते मे २०१८ पर्यंत आहे. या सर्व ग्रामपंचायतीसाठी २५ रोजी मतदान घेण्यात येणार होते. मात्र निवडणुक आयोगाने नऊ रोजी सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने आता मतदान २७ रोजी घेण्यात येईल. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचादेखील यात समावेश आहे.
सुधारीत निवडणुक कार्यक्रम
३१२ ग्रा.पं.च्या ४१०१ तर पोट निवडणुकीच्या ६८७१ जागांसाठीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा पर्यंत करण्यात आली आहे. १२ पर्यंत अर्ज दाखल करावयाचे असून १४ रोजी छाननी होईल. १६ रोजी माघार होऊन दुपारी तीन वाजेनंतर निवडणुक चिन्ह वाटप होईल. २७ रोजी मतदान तर २८ रोजी निकाल जाहीर होतील.
निवडणुक कार्यक्रमात अंशत: बदल केले आहेत. नऊ रोजी राज्य निवडणुक आयोगाचे पत्र मिळाले असून उमेदवारांनी सुधारीत कार्यक्रम माहित करुन घ्यावा. यासाठी निवडणुक शाखेमार्फत प्रबोधन करण्यात येत आहे.
- कैलास देवरे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार चाळीसगाव