vidhan sabha 2019 : मतदारांसह मतदान केंद्र, सहाय्यकारी मतदान केंद्रात जळगाव शहर मतदार संघाची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:49 PM2019-09-26T12:49:41+5:302019-09-26T12:50:43+5:30

सर्वाधिक चार लाख १९६ मतदार : ३६५ मतदान केंद्र तर २९ सहाय्यकारी मतदान केंद्र

Polling center with voters, Jalgaon city constituency leading in supporting polling station | vidhan sabha 2019 : मतदारांसह मतदान केंद्र, सहाय्यकारी मतदान केंद्रात जळगाव शहर मतदार संघाची आघाडी

vidhan sabha 2019 : मतदारांसह मतदान केंद्र, सहाय्यकारी मतदान केंद्रात जळगाव शहर मतदार संघाची आघाडी

Next

जळगाव : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मतदार, मतदान केंद्र तसेच सहाय्यकारी मतदान केंद्रांची संख्या जळगाव शहर मतदार संघात असून या सर्वांमध्ये या मतदार संघाने आघाडी घेतली आहे. तसेच या सर्वांची सर्वात कमी संख्या एरंडोल मतदार संघात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा विशेष मतदान नोंदणी कार्यक्रम राबविला. त्यात मतदारांची संख्या वाढून जळगाव शहर मतदार संघात ती सर्वाधिक झाली. या आकडेवारीनुसार या मतदार संघात एकूण चार लाख १९६ मतदार आहेत. यामध्ये दोन लाख १० हजार ८६१ पुरुष तर एक लाख ८९ हजार ३०१ महिला मतदार आहेत आणि ३४ इतर मतदार आहेत. इतर मतदारांचीही संख्या याच मतदार सर्वाधिक आहे. जळगाव शहर मतदार संघाखालोखाल चाळीसगाव मतदार संघात एकूण ३ लाख ४१ हजार ४५५ मतदार आहेत. यात १ लाख ८१ हजार ५० पुरुष मतदार, १ लाख ६० हजार ३८६ महिला तर १९ इतर मतदार आहेत. त्यानंतर जळगाव ग्रामीण मतदार संघात एकूण ३ लाख १४ हजार ६०४ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ६३ हजार ७८६ पुरुष, एक लाख ५० हजार ८१७ महिला तर इतर एक मतदार आहे. ११ मतदार संघांमध्ये सर्वात कमी २ लाख ७९ हजार ३३९ मतदार एरंडोल मतदार संघात आहेत. यात एक लाख ४४ हजार ५२७ पुरुष, १ लाख ३४ हजार ८१० महिला व इतर दोन मतदार आहेत.
सर्वाधिक ३६५ मतदान केंद्र
मतदान केंद्रांची संख्या पाहता तीदेखील जळगाव शहर मतदार संघात सर्वाधिक ३६५ मतदान केंद्र आहेत. याच मतदार संघात सहाय्यकारी मतदान केंद्रांचीही संख्या सर्वाधिक २९ आहे. असे एकूण ३९४ मतदान केंद्र जळगाव शहर मतदार संघात आहेत. ज्या मतदान केंद्रांवर एक हजार ५०० मतदारांपेक्षा जास्त मतदार आहेत, त्या ठिकाणी सहाय्यकारी मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार जळगाव शहरखालोखाल पाचोरा मतदार संघात ६, भुसावळ मतदार संघात ५, जळगाव ग्रामीण व जामनेरमध्ये प्रत्येकी ४, अमळनेर ३, चाळीसगाव २, रावेर मतदार संघात १ सहाय्यकारी मतदान केंद्र आहे. चोपडा, एरंडोल, मुक्ताईनगर या मतदार संघात एकही सहाय्यकारी मतदान केंद्र नाही.
मतदारांसह मतदान केंद्र, सहाय्यकारी मतदान केंद्रात ‘जळगाव शहर’ची आघाडी - जोड

मतदार संघ निहाय मतदार, मतदान केंद्र व सहाय्यकारी मतदान केंद्रांची संख्या

मतदार संघ मतदार मतदान केंद्र सहाय्यकारी मतदान केंद्र

चोपडा - ३०७७६० ३१८ ०
रावेर - २९२७६३ ३०८ १
भुसावळ - ३०७००५ ३०७ ५
जळगाव शहर - ४००१९६ ३६५ २९
जळगाव ग्रामीण - ३१४६०४ ३२७ ४
अमळनेर - २९२९६१ ३१७ ३
एरंडोल - २७९३३९ २९० ०
चाळीसगाव - ३४१४५५ ३३९ २
पाचोरा - ३१२९६२ ३२२ २
जामनेर - ३०८४६६ ३२१ ४
मुक्ताईनगर - २८९६३७ ३१८ ०
एकूण - ३४४७१४८ ३५३२ ५४

Web Title: Polling center with voters, Jalgaon city constituency leading in supporting polling station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव