जळगाव जिल्ह्यात 102 ग्रामपंचायतसाठी 78.26 टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 11:01 PM2017-10-07T23:01:17+5:302017-10-07T23:02:06+5:30
1024 उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात बंद : एरंडोल तालुक्यात सर्वाधिक 83.79 टक्के मतदान
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 7 - जिल्ह्यातील 102 ग्रामपंचायतींसाठी 7 रोजी 78.26 टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान एरंडोल तालुक्यात 83.79 टक्के तर सर्वात कमी मतदान भुसावळ तालुक्यात 73.56 टक्के झाले. या निवडणुकीत 1024 मतदारांचे भविष्य मतदान यंत्रात बंद झाले.
जिल्ह्यात आज 13 तालुक्यांमधील 102 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. कोठेही वादविवाद झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
सुजदे येथे मतदान यंत्रात बिघाड
जळगाव तालुक्यातील सुजदे येथील प्रभाग क्रमांक तीनमध्ये मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने ते बदलविण्यात आले. मतदान सुरू होण्यापूर्वीच त्यात आवाज येत नसल्याने प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्याने ते बदविण्यात आले.
तालुकानिहाय मतदान (टक्क्यामध्ये)
जळगाव - 78.40
जामनेर - 80.47
एरंडोल - 83.79
धरणगाव -82.90
भुसावळ - 73.56
यावल -76.76
रावेर - 75.86
बोदवड -80.17
अमळनेर - 81.27
चोपडा - 80.38
पारोळा - 82.76
भडगाव - 76.70
चाळीसगाव -77.44
एकूण - 78.26