बहुतांश लोकप्रतिनिधींच्या घर परिसरातील केंद्रांवर ४० टक्केच्या आत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:40 AM2019-05-05T00:40:47+5:302019-05-05T00:41:17+5:30

लोकसभा निवडणूक

Polling within 40 percent of the majority of polling stations in the home constituency | बहुतांश लोकप्रतिनिधींच्या घर परिसरातील केंद्रांवर ४० टक्केच्या आत मतदान

बहुतांश लोकप्रतिनिधींच्या घर परिसरातील केंद्रांवर ४० टक्केच्या आत मतदान

Next

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी प्रचारादरम्यान अधिकाधिक मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत होते. त्यानुसार झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता आमदार, नगरसेवक, पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींच्या परिसरातील मतदान केंद्रांची आकडेवारीही कमी दिसून येते. दरम्यान जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी मोठी जनजागृती झाली, मात्र त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे शहरी आकडेवरून दिसून येते. या मुद्याबाबत अधिकाऱ्यांनी बोलून दाखविले.
शहरातील ३३ केंद्रांवर ४० टक्केच्या आत मतदान झाले असून या ३३ केंद्रांपैकी चार मतदान केंद्र आमदार सुरेश भोळे यांच्या निवासस्थान परिसरातील आहेत. यात रिंग रोडवरील स्टेट बँकेजवळील मतदान केंद्र क्रमांक २०२ (२६ टक्के), ख्वाजा मिया चौकाजवळील मॉडर्न गर्ल्स स्कूल मतदान केंद्र क्रमांक २०० (२९.७० टक्के), ख्वाजामिया चौक मतदान केंद्र क्रमांक १८९ (३५.४५ टक्के) व मतदान केंद्र क्रमांक १९० (३८.२६ टक्के) यांचा समावेश आहे.
या शिवाय नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या परिसरातील भिलपुरा चौक मतदान केंद्र क्रमांक ११२ (३८.५७ टक्के), माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे निवासस्थान असलेल्या शिवराम नगरातील मतदान केंद्र क्रमांक २८९ (३५.१७ टक्के), मतदान केंद्र क्रमांक २८६ ए (३७.५७ टक्के), मतदान केंद्र क्रमांक २९२ (३९.३७ टक्के), भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आमदार स्मिता वाघ यांच्या परिसरातील आर.आर. विद्यालय मतदान केंद्र क्रमांक २०४ ( ३०.७२ टक्के), मतदान केंद्र क्रमांक २०५ (३४.१२ टक्के), मतदान केंद्र क्रमांक २०७ (३४.३८ टक्के), नगरसेवक उज्ज्वला बेंडाळे, नितीन बरडे, बंटी जोशी यांच्या परिसरातील मू.जे. महाविद्यालय मतदान केंद्र क्रमांक २३३ (३१.०४ टक्के), मतदान केंद्र क्रमांक २३४ (३९.६५ टक्के) या पदाधिकाऱ्यांच्या परिसरात ४० टक्केच्या आत मतदान झाले आहे.
भाजपा गटनेत्याच्या परिसरात अधिक मतदान
मनपातील भाजपाचे गटनेते भगत बालाणी यांच्या परिसरातील कंवरनगर कंवरनगर मतदान केंद्र क्रमांक २७६ (७०.९८ टक्के)मध्ये सर्वाधिक मतदान झाले. या सोबतच सिंधी कॉलनी मतदान केंद्र क्रमांक २७९ (६३.६४ टक्के), कंवरनगर मेहरुण मतदान केंद्र क्रमांक २७५ (६१.६५ टक्के), नगरसेवक आबा कापसे यांच्या परिसरातील दांडेकर नगर पिंप्राळा मतदान केंद्र क्रमांक १४० (६०.२२ टक्के) या परिसरात ६० टक्क्याहून अधिक मतदान झाले आहे.
या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांचे निवासस्थान परिसरात असलेल्या पाच पैकी चार मतदान केंद्रांवर ५० टक्केच्या आत मतदान झाले. भाजपाचे नगरसेवक चंद्रशेखर चौधरी यांच्या परिसरातील खोटे नगरातील पाचही मतदान केंद्रावर ५० टक्केच्या मतदान झाले.
शिवाजीनगरात अधिक मतदान
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे निवासस्थान असलेल्या शिवाजीनगरातील २६ पैकी १३ मतदान केंद्रांवर ५० टक्क्यांपेक्षा अधिक तर उर्वरित ११ मतदान केंद्रांवर ४० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे.

Web Title: Polling within 40 percent of the majority of polling stations in the home constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव