पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे निदर्शने , जलसंपदा मंत्र्यांना अडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:59 PM2019-04-11T12:59:30+5:302019-04-11T13:00:01+5:30

काळ्या फिती लावून केला निषेध

Pollsare Dharan Janandalan Sangharsh Samiti opposed the demonstrations and water resources ministers | पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे निदर्शने , जलसंपदा मंत्र्यांना अडवले

पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे निदर्शने , जलसंपदा मंत्र्यांना अडवले

Next

अमळनेर : पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे महायुतीच्या मेळाव्यासाठी येणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना काळ््या फिती गळ्यात घातलेल्या आंदोलनकर्त्यांनी ह्यपाडळसरे धरण झालेच पाहिजेह्ण चे घोषणा फलक दाखवून निदर्शने केली. या धरणासाठी ५० वर्षे वाट पाहिली आता आणखी थोडे दिवस वाट पाहा, निश्चिन्त राहा असे सांगून गिरीश महाजन यांनी वेळ मारून नेली. त्यानंतर मात्र सभेत ही निवडणूक कोणत्या धरणाची नाही किंवा रस्त्याची नाही असे सांगितले.
पाडळसरे धरण शीघ्र गतीने पूर्ण व्हावे म्हणून पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे दीर्घकाळ आंदोलन करण्यात आले. जलसंपदामंत्री महाजन यांनी महामोर्चास निधी देण्याचे दिलेले आश्वासन न पाळल्याने जनआंदोलन समितीतर्फे मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांना पाडळसरे धरणास दिलेले आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी चोपडा नाका येथे टोप्या घालत हातात घोषणा फलक घेऊन व गळ््यात काळ््या पट्या घालून मोठ्या संख्येने उपस्थित होते.आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने निदर्शन केली. याप्रसंगी महाजन यांनी वाहनातून उतरत बोला, आपल काय म्हणणे आहे, मी रस्त्यावरचा माणूस आहे इथंही बोलू या, असे सांगितले. तर आंदोलनकर्ते माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील यांनी पाडळसरे धरण हा मोठा प्रश्न असून रस्त्यावर चर्चा करता येणार नाही असे सांगितले. त्यावर महाजन यांनी धरण हा माझ्याच जिल्ह्यातील विषय आहे. मला या प्रश्नांची जाणीव आहे, निवडणुकीनंतर प्राधान्याने या कडे लक्ष देतो, असे सांगितले. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी जनआंदोलन समितीचे पदाधिकारी एस.एम. पाटील, रणजित शिंदे, अजयसिंग पाटील, वसुंधरा लांडगे, प्रतिभा पाटील, प्रा.अशोक पवार, महेश पाटील, सुनील पाटील, योगेश पाटिल, देविदास देसले, रवींद्र पाटील, प्रशांत भदाणे, आदी उपस्थित होते.

Web Title: Pollsare Dharan Janandalan Sangharsh Samiti opposed the demonstrations and water resources ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.