‘गरीब रथ’मधून १२ लाख ८० हजार लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 06:08 PM2019-11-04T18:08:48+5:302019-11-04T18:10:05+5:30

गरीब रथ या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे साखर झोपेमध्ये असताना १२ लाख ८०हजाराचे सोन्याचे दागिने असलेली हॅन्डबॅग चोरट्यांनी लांबविली

From the 'poor chariot', he removed 1 lakh 5 thousand | ‘गरीब रथ’मधून १२ लाख ८० हजार लांबविले

‘गरीब रथ’मधून १२ लाख ८० हजार लांबविले

Next
ठळक मुद्देगरीब रथ एक्सप्रेसमधील हरदा भुसावळ दरम्यानची घटनामध्य प्रदेशच्या प्रवाशाची चोरट्यांनी पळविली हॅण्डबॅग

वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : गरीब रथ या गाडीने प्रवास करणाऱ्या मध्य प्रदेशच्या प्रवाशाचे हरदा ते भुसावळ दरम्यान साखर झोपेमध्ये असताना १२ लाख ८०हजाराचे सोन्याचे दागिने असलेली हॅन्डबॅग चोरट्यांनी लांबविली ही घटना ३ रोजी रात्री साडेबारा ते पहाटे चारच्या दरम्यान घडली.
आशिष सोनी रा.गाडरवारा, जि.नरसिंगपूर, मध्य प्रदेश हे त्यांच्या पत्नीसह गाडी क्रमांक १२१८७ अप गरीब रथ गाडीच्या जी/४ कोचमध्ये सीट क्रमांक ४०-४१ वर प्रवास करीत होते. ते साखर झोपेत असताना ३ रोजी रात्री साडेबारा ते चारच्या सुमारास चोरट्याने त्यांची हॅण्डबॅग घेऊन पलायन केले. बॅगमध्ये सोन्याचे नेकलेस, अंगठी, बिंदी, चैन, बांगड्या, घड्याळ, मोबाइल, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड असा एकूण १२ लाख ८० हजारांचा ऐवज होता. याप्रकरणी मुंबई येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. परंतु ही घटना भुसावळ विभागातील असल्यामुळे ही भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. याप्रकरणी लोहमार्गाचे पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव हे तपास करीत आहे.
दरम्यान, नुकतेच १५-२० दिवसांपूर्वी मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे अधिकारी विवेककुमार गुप्ता हे सपत्नीक प्रवास करीत असताना चोरट्यांनी त्यांची ही बॅग लांबवली होती.
रेल्वेच्या प्रवासात सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह
आरामदायी, सुरक्षित, स्वस्त प्रवास म्हणून रेल्वे प्रवासाकडे जनसामान्याचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. परंतु प्रवास करत असताना मोबाइल, सामान, मौल्यवान वस्तू चोरीस जाणे हे नित्याच्या घटना झाल्या आहेत.
डीआरएमसारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या सामानाची रेल्वे प्रवासादरम्यान चोरी होते तर सर्वसामान्यांच्या प्रवासावर सुरक्षित प्रवास करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सुरक्षेविषयी मोठ्या गप्पा, कृती मात्र शून्य
सणासुदीचे दिवस सुरू आहेत. रेल्वे प्रवास करत असताना नियोजित ठिकाणी सोबत असलेला सामान सुरक्षितरित्या पोहोचेल याची हमीच दिसून येत नाही. रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेविषयी मोठमोठ्या गप्पा करतात. मात्र दररोज चोरीच्या घटनांमुळे कृती शून्य दिसून येत आहे.

Web Title: From the 'poor chariot', he removed 1 lakh 5 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.