कुंभार समाजाचा व्यवसाय धोक्यात?
By admin | Published: January 19, 2016 12:55 AM2016-01-19T00:55:26+5:302016-01-19T00:55:26+5:30
महसूल विभागाकडून अनेकांकडून कर वसूल केला जात आह़े यामुळे कुंभार समाजाचा परंपरागत व्यवसाय धोक्यात आला आह़े
धरणगाव : शासनाने परंपरागत विटा, मडकी, मातीची भांडी तयार करणा:या कुंभार समाजाला वर्षभरात 500 ब्रास माती उत्खनन करण्यास स्वामित्व धन देण्याची गरज नसल्याचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आह़े मात्र महसूल विभागाकडून अनेकांकडून कर वसूल केला जात आह़े यामुळे कुंभार समाजाचा परंपरागत व्यवसाय धोक्यात आला आह़े याबाबत जिल्ह्यातील कुंभार समाजाच्या वतीने महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना निवेदन देण्यात आले असून समस्येचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आह़े असे आहे शासनाचे परिपत्रक? महसूल आणि वनविभागाचे अपर मुख्य सचिव यांनी 21 जुलै 2014 रोजी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, तहसीलदारांच्या लेखी पूर्वपरवानगीने व कोणतीही फी किंवा स्वामित्वधन न देता पिढीजात कुंभाराच्या कुटुंबास विटा व इतर मातीच्या वस्तू तयार करण्यास त्याच्या व्यवसायाच्या प्रयोजनासाठी 500 ब्रासर्पयत माती काढता येईल. मात्र त्याच्यापेक्षा अधिक माती वाहतूक केल्यास गौण खनिज कायद्यानुसार (स्वामिधन) महसूल आकारण्यात येईल. हा लाभ घेण्यासाठी तहसीलदार यांच्याकडून ओळखपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक राहील़ जागेचीही अवाजवी भाडे आकारणी ज्या जागेवर कुंभार समाज विटांची भट्टी उभारतात त्याचे शासकीय नियमानुसार 60 रुपये आर. प्रमाणे जागा भाडे ठरविण्यात आले आहे. मात्र तो दर न लावता अवाजवी भाडे दर आकारणी केली जात असल्याची कुंभार समाजाची तक्रार आहे. महसूल वसुली सक्तीची शासनाच्या निर्णयाला न मानता जिल्ह्यात धरणगावसह काही तालुक्यात कुंभार समाजाकडून सक्तीची महसूल वसुली केली जात आहे. धरणगाव तहसीलदार शशिकांत खैरनार यांनी 20 हजार रुपये भरल्याशिवाय माती वाहतूक करू देऊ नये, असे फर्मान कर्मचा:यांना काढल्याने धरणगाव तालुक्यातील कुंभार समाज हैराण झाला आहे. जिल्ह्यात याला पायबंद घालण्याची मागणी होत आहे. महसूलमंत्र्यांना निवेदन या संदर्भात कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष शेखर कापडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कुंभार, सचिव सखाराम मोरे, बनलाल कुंभार, देवीदास कुंभार, मंगल कुंभार आदींनी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे ठोस न्याय मागितला आहे. (वार्ताहर)