गोंदेगावला लोकसहभागातून पालटले जि.प. शाळेचे रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 04:49 PM2019-03-27T16:49:22+5:302019-03-27T16:49:34+5:30
डिजिटल वर्गखोल्या
शेंदुर्णी, ता. जामनेर : ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक शिक्षण मिळावे, जगात घडणाऱ्या घटनांची माहिती मिळावी व डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी येथूनच जवळ असलेल्या गोंदेगाव येथील जि.प. शाळेचे लोकसहभागातून रुप पालटले आहे. या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या डिजिटल वर्गखोल्याचे नुकतेच मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.
पोलीस पाटील विलास खाकरे, बडोदा विद्यापीठाचे कुलगुरू तथा शाळेचे माझी विद्यार्थी शिरीष कुलकर्णी, उपसरपंच रामदास चव्हाण, मुख्याध्यापिका तारा पाटील, शिक्षक गणेश पाटील यांच्या सहकार्यातून डिजिटल वर्गखोल्या साकारण्यात आल्या आहे. त्याचे उद््घाटन नुकतेच झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास खाकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सीमा पाटील, केंद्र प्रमुख सुभाष कुमावत, जेमराबाई तडवी, छायाबाई मगरे, अशोक औटे, पंढरी बोदडे, सुभाष शिंदे, नामदेव मापारी, डॉ. देवानंद कुलकर्णी, श्रीकृष्ण चौधरी, योगेश पवार, देवानंद शिंदे, देवा फाउंडेशनचे सदस्य, परिसरातील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
प्रास्ताविक तारा पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले. शाळेत उभारण्यात आलेल्या वर्गखोल्या लक्ष वेधून घेत आहेत.