बनावट अकाउंट उघडून पाठविले अश्लिल संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:15 AM2021-04-17T04:15:03+5:302021-04-17T04:15:03+5:30

लोकमत न्यज नेटवर्क जळगाव : इंस्टाग्रामवर सागर गोकूळ पाटील (३०,रा.जामनेर) यांच्या नावाने बनावट अकाउंट उघडून अश्लिल संदेश पाठविणा-या अज्ञात ...

Pornographic messages sent by opening a fake account | बनावट अकाउंट उघडून पाठविले अश्लिल संदेश

बनावट अकाउंट उघडून पाठविले अश्लिल संदेश

Next

लोकमत न्यज नेटवर्क

जळगाव : इंस्टाग्रामवर सागर गोकूळ पाटील (३०,रा.जामनेर) यांच्या नावाने बनावट अकाउंट उघडून अश्लिल संदेश पाठविणा-या अज्ञात व्यक्तीविरूध्‍द सायबर पोलीस पोलीस ठाण्‍यात गुरूवारी गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

जामनेरातील सागर पाटील यांचे इंस्टाग्राम या सोशल मीडियावर अकाउंट आहे. १४ एप्रिल रोजी कुणीतरी त्यांच्या नावाचे बनावट अकाउंट बनविले. नंतर त्या अकाउंटवरील स्टेट्सवर फिर्यादी यांच्या मित्राच्या पत्नीचे फोटो अपलोड केले. दरम्यान, कुणीतरी आपल्या नावाचे बनावट अकाउंट तयार करून मित्राच्या पत्नीचे फोटो टाकत असल्याची बाब सागर पाटील यांच्या लक्षात येताच, त्यांनी त्या बनावट अकाउंटवर संदेश पाठवून ते डिलीट करण्‍यास सांगितले. त्यानंतर या प्रकरणी गुरूवारी जळगावातील सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

Web Title: Pornographic messages sent by opening a fake account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.