मनपा महसूलच्या थकबाकीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:12 AM2021-04-03T04:12:41+5:302021-04-03T04:12:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाकडे असलेल्या महसूल विभागाच्या १३.३० कोटी थकबाकीबाबत पुनर्गठन किंवा इतर काही मार्गाने सकारात्मक निर्णय ...

A positive decision should be taken regarding the arrears of municipal revenue | मनपा महसूलच्या थकबाकीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा

मनपा महसूलच्या थकबाकीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपाकडे असलेल्या महसूल विभागाच्या १३.३० कोटी थकबाकीबाबत पुनर्गठन किंवा इतर काही मार्गाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महापौर जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना केली आहे.

महानगरपालिकाकडे महसूल विभागाची १३.३० कोटी रक्कम थकीत आहे. काही दिवसांपूर्वी या रकमेबाबत मनपाची बँक खाती गोठवली जाणार होती. गेल्या अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या या रकमेबाबत मनपाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता काही तरी सकारात्मक तोडगा काढावा, यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, सुनील महाजन, नितीन बरडे, गणेश सोनवणे, प्रशांत नाईक, सचिन पाटील, जाकीर पठाण आदी उपस्थित होते.

Web Title: A positive decision should be taken regarding the arrears of municipal revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.