अण्णा हजारेंशी सकारात्मक चर्चा- गिरीश महाजन यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 08:12 PM2018-03-25T20:12:29+5:302018-03-25T20:29:34+5:30

अमित शहा यांच्या सूचनेवरुन मध्यस्थी

Positive talk with Anna Hazare - Girish Mahajan's claim | अण्णा हजारेंशी सकारात्मक चर्चा- गिरीश महाजन यांचा दावा

अण्णा हजारेंशी सकारात्मक चर्चा- गिरीश महाजन यांचा दावा

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणूक सोडून धावावे लागले दिल्लीलागिरीश महाजन यांना मध्यस्थीचे अधिकार

जळगाव - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरु केलेले बेमुदत उपोषण मागे घ्यावे यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी दिल्ली येथे प्रयत्न सुरु केले आहे.. त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सुरु असून येत्या एक- दोन दिवसात अण्णा आपले हे आंदोलन मागे घेतील असा विश्वास गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. गिरीश महाजन हे गेल्या महिनाभरापासून अण्णा हजारे यांच्या संपर्कात होते. परंतु अखेरच्या क्षणीही शिष्टाई होऊ शकली नव्हती. दरम्यान महाजन यांचा अण्णांशी असलेला संपर्क पाहता आंदोलनाबाबत समन्वय घडवून आणण्याची जाबाबदारी महाजन यांच्यावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोपवली आहे. यानुसार शहा यांना शनिवारी अचानक निरोप येताच ते रात्रीच जामनेर येथून दिल्लीकडे रवाना झाले आणि सकाळी 11 वाजता दिल्लीत पोहचल्यावर त्यांनी समन्वयासाठी प्रयत्न सुरु केले आहे. याबाबतची माहिती त्यांनी ‘लोकमत’ ला दूरध्वनीवर बोलताना दिली. निवडणूक सोडून धावावे लागले दिल्लीला महाजन यांच्या गावात म्हणजेच जामनेर येथे नगरपालिकेची निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या प}ी साधना महाजन या रिंगणात आहेत. याचबरोबर सोमवारी माघारीची अखेरची मुदत असल्याने गिरीश महाजन हे दोन - तीन दिवस मतदार संघातच थांबणार होते, मात्र, शनिवारी रात्री अचानक अमित शहा यांचा फोन आल्याने ते तातडीने दिल्लीत दाखल झाले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गिरीश महाजन यांना मध्यस्थीचे अधिकार दिले आहे. दरम्यान अण्णांच्या काही मागण्या मान्य करण्याची सरकारची भूमिका असून काही मागण्यांवर चर्चा सुरु आहे, लवकरच तोडगा निघेल असेही महाजन यांनी सांगितले.

Web Title: Positive talk with Anna Hazare - Girish Mahajan's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव